संजीवनी युवा प्रतिष्ठानची ९ वर्षाची यशस्वी वाटचाल
दहावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
सेवा हाच धर्म या भावनेने संजीवनी युवा प्रतिष्ठानची युवानेते विवेक कोल्हे यांनी दहा वर्षापूर्वी स्थापना करून युवकांना नवचेतना दिली. जागवूया ज्योत माणुसकीची हे ब्रीद जपत सेवा,समर्पण, संस्कार, संस्कृती यांची जपणूक करणारी ९ वर्षाची यशस्वी वाटचाल झाली आहे.यंदा दहावा वर्धापन दिन राष्ट्रीय युवा दिनाचे व राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीचे निमित्ताने कोपरगाव व्यापारी धर्मशाळा येथे संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.रेणुका कोल्हे यांच्या उपस्थितीत चित्रकला स्पर्धा आयोजित करून साजरा करण्यात आला.
विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातून मोठा प्रतिसाद विद्यार्थी आणि कलाप्रेमींकडून मिळाला.पाच हजारहून अधिक स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला आहे. तालुक्यातील जवळपास ८५ हुन जास्त शाळा,विद्यालय, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य स्पर्धेतून सिद्ध केले आहे.
प्रारंभी स्पर्धकांच्या पालकांच्या हातून दीप प्रज्वलन करून स्पर्धेसाठी रेणुका कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहा वर्षात केलेल्या समाज उपयोगी कामांचा लेखाजोखा मांडला.युवकांना संजीवनी युवा प्रतिष्ठानसमवेत जोडण्यासाठी आवाहन त्यांनी केले. यावेळी कोपरगाव शहर व पंचक्रोशीतील एकूण ३८ शाळा विद्यालय महाविद्यालयातील ५४५ विद्यार्थ्यांनी सहभाग या स्पर्धेत घेतला. संजीवनी युवा प्रतिष्ठान नेहमीच विद्यार्थ्यांना कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देते.आपली युवा पिढी ही अधिक सक्षम व्हावी यासाठी विवेक कोल्हे सातत्याने उपक्रमशील त्यामुळे सामाजिक जाणीव जपण्याचे काम अनेक तरुण करत आहेत याचे समाधान वाटते असे शेवटी रेणुका कोल्हे म्हणाल्या.स्पर्धकांनीही संजीवनी युवा प्रतिष्ठानचे आभार देखील यावेळी व्यक्त केले.
प्रसंगी अनेक शाळा महाविद्यालयांचे शिक्षक,पालक,सिद्धार्थ साठे,रोहित कनगरे, सतीश निकम, शेखर कुऱ्हे, दत्तूनाना संवत्सरकर,रुपेश सिनगर,अनिल गायकवाड यासह संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक यावेळी उपस्थित होते.सदर स्पर्धा पार पाडण्यासाठी युवा सेवकांनी अभूतपूर्व मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.










