ब्रम्हलिन संत रामदासी महाराजांचा ३५ वा पुण्यतिथी सोहळा
कोपरगांव: ( लक्ष्मण वावरे )
तालुक्यातील कोकमठाण येथील प. पू. ब्रम्हलिन संत श्री रामदासी महाराज यांच्या ३५ व्या पुण्यतिथी निमीत्त किर्तन महोत्सवासह तुकाराम गाथा पारायण सोहळयाचे १६ ते २३ जानेवारी पर्यंत आयोजन करण्यांत आले असल्याची माहिती समस्त रामदासी बाबा भक्त मंडळ, व भजनी मंडळ तिर्थक्षेत्र कोकमठाण येथील गांवक-यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात दिली.
त्रंबकेश्वर येथील आनंद आखाडयाचे श्री श्री १००८ गणेशानंद सरस्वती महाराज, खातगांव कर्जतचे कार्याध्यक्ष समर्थभक्त मोहनबुवा रामदासी यांच्या प्रमुख उपस्थितीत २३ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता पुणतांबा येथील मुक्ताई ज्ञानपिठाचे महंत गुरूवर्य रामानंदगिरी शास्त्री यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता व त्यानंतर महाप्रसादाचे वितरण होईल.
त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, या सप्ताह काळात पहाटे ४ ते ६ काकडआरती, सकाळी ८ ते ११ तुकाराम गाथा पारायण, सायंकाळी ५ ते ६ सामुदायिक हरिपाठ व रात्रौ ७ वाजता किर्तन याप्रमाणे कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमांसाठी गायनाचार्य हभप अरूण महाराज पगारे, हभप निळोबा महाराज, मृदुंगाचार्य हभप धिरज महाराज कु-हे, व्यासपीठचालक हभप तुकाराम महाराज वेलजाळे यांची साथ लाभणार आहे.
१६ जानेवारी रोजी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख विश्वस्थ प पू रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते कलश व ग्रंथ पुजनाने या पुण्यतिथी सोहळयाचा शुभारंभ होत आहे. हभप अरूण महाराज रोहम (१६ जानेवारी), हभप जालिंदर महाराज शिंदे (१७ जानेवारी), स्वामी नित्यानंदगिरी महाराज (१८ जानेवारी), हभप रामेश्वर महाराज शास्त्री (१९ जानेवारी), हभप योगिराज दादा महाराज (२० जानेवारी), डॉ शुभम महाराज कांडेकर (२१ जानेवारी), हभप समर्थभक्त प्रसादबुवा रामदासी (२२ जानेवारी) यांचे रात्रौ सप्ताहभर किर्तन होईल.
२२ जानेवारी रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत प. पू. रामदासी महाराज यांची प्रतिमा व ग्रंथ मिरवणुक काढण्यांत येणार आहे.
या सप्ताह काळात महंत स्वामी शिवानंदगिरी महाराज (मंजुर), जंगलीदास माऊली, रमेशगिरी महाराज (कोपरगांव बेट), गणेशानंद महाराज (जालना), राघवेश्वरानंद महाराज (कुमारी), रामदास महाराज वाघ, भगवतानंदगिरी महाराज (कोकमठाण), महेंद्रपुरी महाराज (हनुमान टेकडी) मुकुंद महाराज (भगुरकर), श्रध्दानंद महाराज (महांकाळ वाडगांव), विठठलानंद महाराज (कारवाडी) गणपत महाराज लोहाटे (कोपरगांव) आदि संत-महंतांची गमुख्यांनी उपस्थिती राहणार आहे.
सदरचा कार्यकम यशस्वी करण्यांसाठी पंचकोशीतीलग्रामस्थ व कोकमठाण येथील रामदासी महाराज भक्त मंडळ प्रयत्नशिल आहेत. नेवासा येथील सेवानिवृत्त शिक्षक रंगनाथ किसन डहाळे सर यांनी ब्रम्हलिन संत रामदासी महाराजांच्या जीवन कार्यावर कृष्णा गोदाकाठचे योगी, तीनखणीचा रामानुभव, समर्थविचारधारा या तीन पुस्तकांचे लेखन केलेले आहे.
२३ जानेवारी रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत रामदासी महाराज समाधीस्थानावर सौ. सुनिता व मुकुंद शुक्लेश्वर बिडवे यांच्या हस्ते लघु रुद्राभिषेकाचे आयोजन करण्यांत आले आहे. तेंव्हा भाविकांनी या सर्व कार्यकमाचा लाभ घ्यावा व यथाशक्ती सहकार्य करावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.








