कागदी चहाच्या कपावर बंदी घालावी -- डॉ अशोक गावित्रे
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
चहासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदी कप बनवताना त्यात बी पी ए नावाच केमिकल वापरले जाते तसेच कपामध्ये हायड्रोफोबिन फिल्मचा थर आतून दिला जातो व गरम चहासोबत तो त्यात विरघळून पोटात गेल्यास कॅन्सर चा धोका उद्भवतो ,एका चहाच्या कपासोबत पंचवीस हजार मायक्रोम प्लास्टिक पोटात जाते हे सामान्य जनतेला जीवितास हानिकारक आहे तरी यावर बंदी घालावी अशी मागणी डॉ अशोक गावित्रे यांनी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली
नगर पालिका व ग्रामपंचायत हद्दीतील चहा टपरीधारकांची एक बैठक आयोजित करावी व त्यात हा निर्णय घ्यावा ,तसेच नियमांच उल्लंघन केल्यास दंड म्हणून पहिल्या वेळेस ५००,दुसऱ्यादा१००,तिसऱ्यादा १५०० त्यानंतर केल्यास त्यांचा व्यवसाय परवाना रद्द करावा ,तसेच यासंदर्भात ठिकठिकाणी फलक लावावेत व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी व कागदी कपा वर त्वरित बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केली आहे


.jpg)




