संतांवर श्रध्दा ठेवा -स्वामी नित्यानंदगिरी महाराज
कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
संत सेवाधर्मातून परिसराचा कायापालट करत असतात, तेव्हा संतांवर श्रद्धा ठेवा असे प्रतिपादन पिंपळवाडी येथील सिध्दाश्रमाचे स्वामी नित्यानंदगिरी महाराज यांनी केले.
तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथील ब्रम्हलिन संत रामदासी महाराज यांच्या 35 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त किर्तन महोत्सवाचे आयोजन करायांत आले असून त्याचे तिसरे पुष्प शनिवारी पार पडले त्याप्रसंगी ते बोलत होते.
ब्रम्हलिन संत रामदासी महाराज यांनी कोपरगांव पंचक्रोशीला आपल्या निष्काम भक्तीतून संस्काराचा ठेवा दिला गोदावरी नदीकाठ पवित्र असुन दक्षिण वाहीनी, गोदाकाठी त्यांनी केलेली तपसाधना महान आहे. दुसत्यांच्या परोपकारासाठी त्यांनी आपले जीवन व्यतीत केले,
असे सांगुन स्वामी नित्यानंदागीरी महाराज पुढे म्हणाले की, राजा जरी असला तरी त्याच्या अंगी सेवा करण्याचा गुण असावा लागतो त्याशिवाय त्याचे मोठेपण सिद्ध होत नाही. रामदासीबाबा भक्त मंडळ व त्यांचे सहकारी कोकमठाण येथे गेल्या ३५ वर्षापासुन सेवा देत आहे हा त्यांचा चांगुलपणा आहे मात्र तो आपण घेतला पाहिजे. परमेश्वर देखील भक्तांची सेवा करत असतात. कोकमठाण या स्थानालाही ऐतिहासिक महत्व आहे प्रभुश्रीरामचंद्रांना १४ वर्षे वनवास झाला त्यातील काही काळ त्यांनी येथे व्यतित केला होता. या स्थानावर ज्यांनी ज्यांनी साधना केली त्या सर्वांचे प्रत्येकाने आठवण ठेवावी असेही ते म्हणाले.