banner ads

आ. आशुतोष काळेंवर फुलांची उधळण

kopargaonsamachar
0

 आ. आशुतोष काळेंवर   फुलांची उधळण


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

विधानसभेची निवडणूक विक्रमी मताधिक्याने जिंकल्यानंतर आ. आशुतोष काळे प्रथमच गौतम पब्लिक स्कूलमध्ये आले त्यांच्या  समवेत संस्थेचे अध्यक्ष मा. आ. अशोकराव काळे, सचिव सौ. चैताली काळे यांचे शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

 आ. आशुतोष काळे यांचे औक्षण करण्यात येवून प्रवेश मार्गावर दुतर्फा उभ्या असलेल्या नववारीत नटलेल्या गौतमच्या विद्यार्थिनींकडून रंगीबेरंगी, मनमोहक फुलांची उधळण करण्यात आली.


 लेझिम पथक, झांज पथक, पावरी नृत्य पथकांनी आपापले नृत्याविष्कार एकाच वेळी सादर करून आ.आशुतोष काळे यांचे दिमाखात स्वागत केले. 


.संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सलिंग मीटिंगच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे, व्हाईस चेअरमन छबुराव आव्हाड, सचिव सौ.चैताली काळे, विश्वस्त कारभारी आगवन, सय्यद सिकंदर चांद पटेल, किसनराव पाडेकर, बाबासाहेब कोते, सुनील बोरा, राधू कोळपे,दिलीप चांदगुडे, ज्ञानदेव मांजरे, अक्षय काळे, मधुकर बडवर आदी मान्यवर व संस्था सदस्य, प्राचार्य नूर शेख, सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ. विजया गुरसळ, गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युटचे प्राचार्य सुभाष भारती, मुख्याध्यापक प्रकाश देशमुख, मुख्याध्यापक बाळासाहेव गुडघे शाळेत उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुधाकर निलक, रमेश पटारे, गोरक्षनाथ चव्हाण, पर्यवेक्षक, सर्व हाउस मास्टर्स, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी काम पाहिले. प्रास्ताविक कारभारी आगवन यांनी केले तर सूत्रसंचालन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!