ब्राम्हणगाव येथे प्रजासत्ताक दिनी गुणवंतांचा सन्मान
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकर वस्ती ब्राह्मणगाव येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करत गुणावंतांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या ध्वजारोहण प्रसंगी ज्ञानदेव पाटील जगधने, बाळासाहेब बनकर, बाळासाहेब केकान, शोभा बनकर, वैशाली मोरे, संदीप मोरे, नितीन सोनवणे, प्रवीण सांगळे, शरद पवार, श्रावण अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिन व संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत राजमाता जिजाऊ ,शिरीष कुमार, सावित्रीआई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, स्वातंत्र्य सैनिक आदींच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी केली होती संविधान प्रतिमेचे आणि संविधान पुस्तिकेचे पूजन याप्रसंगी करण्यात आले. जनजागृती संविधानाची हे अप्रतिम असे पथनाट्य विद्यार्थिनींनी सादर करत संविधान गीतावरती नृत्य सादर केले.
तालुकास्तरीय, केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात येऊन माता पालक मेळाव्यानिमित्त घेण्यात आलेल्या माता पालकांसाठी च्या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. प्रजासत्ताक दिना विषयी व संविधानाविषयी शिक्षक महेंद्र निकम यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी केले. कार्यक्रमासाठी शिवाजी सांगळे, विनोद सोनवणे ,सुदाम सोनवणे, वनिता सोनवणे, उषा जाधव, पद्मा सोनवणे, शितल आसने, माया सांगळे, ज्योती इनामके, योगिता बनकर, शशिकला सोनवणे, सुलोचना मोरे,रत्ना बनकर , लता शिंगाडे,सुनिता माळी, सुनिता इल्हे सह माता व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते उपस्थितांचे आभार मनीषा जाधव यांनी मानले.