banner ads

के.जे.सोमैया महाविद्यालयाकडुन डाउच बु. शाळेला संगणक संच भेट

kopargaonsamachar
0

 के.जे.सोमैया महाविद्यालयाकडुन डाउच बु. शाळेला संगणक संच भेट 


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

  के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाकडून  ग्रामविकासाचा दृष्टिकोण समोर ठेऊन कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत डाउच बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला संगणक संच भेट देण्यात आले. 


विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय परिसरातील अनेक जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थीकेंद्रित मदत करत असते. डाउच बु. या गावात महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने सलग तीन वर्षे श्रमसंस्कार शिबिर आयोजित करून गावातील सुशोभीकरणाबरोबरच रस्ते दुरुस्ती, वृक्ष लागवड, वनराई संवर्धन, सामाजिक प्रबोधन इत्यादी कामे केलेली आहे. 


येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची विविध स्तरावरील कामगिरी ही नेत्रदीपक असून येथील शिक्षकवृंद विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मेहनत घेत असतात. आधुनिक शिक्षण पद्धतीची गरज ओळखुन या शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त  संदिप रोहमारे यांनी या शाळेला महाविद्यालयाच्या वतीने संगणक संच भेट देण्याचे ठरविले. व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन हे संगणक संच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. विजय ठाणगे, गोदामाई प्रतिष्ठाणचे अध्यक्ष  आजिनाथ ढाकणे, राष्ट्रिय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एस. गायकवाड, डॉ. संजय दवंगे यांच्या हस्ते शाळेला सुपूर्द करण्यात आले. 


या वेळी  शाळेच्या  मुख्याध्यापिका श्रीमती पुष्पलता गवळी, शिक्षकवृंद प्रा. किरण रोकडे,  विष्णु होन,  राजेंद्र पोटे, सौ. प्रांजली मोरे, डाउच बु. ग्रामपंचायतचे सरपंच  दिनेश गायकवाड, उपसरपंच सौ. उषा ढमाले, माजी उपसरपंच व जेष्ठ नागरिक भिवराव दहे,  योगेश दहे,  दादासाहेब दहे व इतर मान्यवर उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!