कोपरगांवच्या सोमेश्वर महादेवाला प्रजासत्ताक दिनी फुलपानांची सजावट.
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )कोपरगाव शहरातील वेस जुने गावठाण,सराफ बाजारातील श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव शिवलिंगास भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या (अमृत महोत्सवी) वर्धापन दिनानिमित्त विविध फुलांनी सजवून सोमेश्वर देवस्थानचे वतीने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या .
परमारांचा राजा भोज यांचे वंशज मानले गेलेल्या धार-देवास संस्थानचे श्रीमंत पवार यांची कारकीर्द ईतिहासात अजरामर आहे.शहाजीराजे भोसले.छत्रपती शिवाजीराजे महाराज श्रीमंत पेशवे या सर्वांच्या कालखंडात पवार घराण्याचे स्वराज्य आणि सुराज्य लढाईतील योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे...श्रीमंत पवार सरकार संस्थानचे कालखंडात त्यांचे अधिपत्याखाली असलेल्या गावांचा कारभार अतिशय उत्तम आणि सर्वसमावेशक समजला जातो भारत स्वातंत्र्यानंतर श्रीमंत पवार सरकार संस्थान मध्यभारत संघात विलीन झाले.
कोपरगाव नगरीतील धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे मानले गेलेले सोमेश्वर महादेवावर आजही ग्रामस्थांची मोठी श्रध्दा आहे...कोपरगाव शहरात जल संकटात या महादेव मंदिराचा गाभारा पाण्याने पुर्ण भरल्यानंतर सोमेश्वर महादेव जल संकटात धावून येतो.अशी ग्रामस्थांची श्रध्दा आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध फुलं पानांचा उपयोग सोमेश्वर महादेव शिवलिंग सजवितांना केला आहे मंदिराचे द्वारावर आंब्याचे पानांचे तोरण बांधले आहे.तसेच आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.
अध्यात्मिक भक्ती ईतकीच राष्ट्र भक्ती महत्वाची असल्याचा संदेश या निमित्ताने श्रीमंत महामहीम पवार सरकार संस्थानचे सोमेश्वर महादेव मंदिर व्यवस्थापनाने दिला आहे.
सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके,व्यवस्थापन समितीचे नारायण अग्रवाल,जयंत विसपुते,महावीर शिंगी,निलेश उदावंत, चंद्रकांत कौले, देवस्थानचे पौरोहित्य प्रविणशास्री मुळे गुरु, प्रदिपशास्री पदे गुरु,नंदु शेंडे गुरव यांचे सह सोमेश्वर महादेव भक्त मंडळ कामकाज पहात आहे.श्रीमंत पवार सरकार महादेव देवस्थानचे कार्यात योगदान देणा-या सर्व भक्तांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके यांनी प्रजासत्ताक दिनाच्या आभार मानून शुभेच्छा दिल्या .