banner ads

शासकीय कार्यालयाच्या इमारतीवर सौर यंत्रणा उभारावी"

kopargaonsamachar
0

 शासकीय कार्यालयाच्या इमारतीवर सौर यंत्रणा उभारावी"


कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )

शासनाने सौर ऊर्जेचा वाढता प्रचार आणि प्रसार सूरू केला असुन त्या साठी मोठे अनुदान जाहीर केले आहे. त्यामूळे सर्वच शासकीय कार्यालयाच्या इमारतींवर सौर यंत्रणा उभारावी .


केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी सौर ऊर्जेचा वापर करून विजेची बचत व्हावी या साठी सौर यंत्रणा उभारावी म्हणून शेतकऱ्यांना मोठे अनुदान जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना वाढत्या लोड शेडींग पासुन मुक्तता मिळावी म्हणून सौर पंप बसवावे असे आवाहन केले आहे. 


तालुक्याच्या ठिकाणी पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय पंचायत समिती,कृषी उत्पन्न बाजार समिती,कृषी विभाग वन विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती शासकीय दवाखाने, नगर पालिका, दुय्यम निबंधक, सहकार निबंधक, कोर्ट अशी अनेक शासकीय कार्यालये आहेत.तसेच ग्रामीण भागात ग्राम पंचायत, तलाठी कार्यालय,सोसायट्या या ठिकाणी असणाऱ्या कार्यालयांना ट्यूब लाईट पंखे तसेच सर्वच कार्यालयात संगणक प्रणाली आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर केला जातो. तसेच अनेकदा लोड शेडिंग चा फटका या कार्यालयांना बसून नागरिकांची अनेक कामे प्रलंबित राहतात त्यामूळे नागरिकांना छोट्या छोट्या कामासाठी चकरा माराव्या लागतात. तसेच दर वर्षी लाखो रुपये वीज बिलापोटी शासनाच्या तिजोरीवर ताण पडतो.या कार्यालयात सौर यंत्रणा उभी केल्यास शासनाचे लाखो रुपये बचत होईल तसेच या सर्वच कार्यालयांच्या वेळा ११ ते ५ अशा आहेत त्यामूळे सौर यंत्रणेचा वापर होईल व नागरिकांना देखील या योजनेची माहिती होऊन शेतकरी व व्यापारी वीज ग्राहक या योजनेकडे आकर्षित होतील त्यामूळे सरकारने सर्वच शासकीय कार्यालयाच्या इमारतींवर सौर यंत्रणा उभारावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे ॲड नितीन पोळ यांनी केली आहे
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!