कोपरगाव बस आगार होतोय चोरांचा हॉटस्पॉट" ?
कोपरगांव / लक्ष्मण वावरे
मागील काही दिवसांपासून कोपरगाव बस आगारात महीला प्रवाशी यांचे दागिणे व पैसै चोरीच्या घटना पाहता कोपरगाव बस आगार चोरांचा हॉटस्पॉट होतोय का अशी शंका वाटू लागली आहे.
एस टी प्रवासात महिलाना सवलत मिळाल्याने एस टी प्रवासात महिलांची संख्या लक्षणीय वाढली आहे. रस्त्यांची झालेली दुरवस्था, वाढती इंधन दर वाढ, एस टी प्रवासात महिलाना सवलत त्यामूळे अनेक महिला एस टी ने प्रवास करण्यात धन्यता मानू लागल्या आहेत.
कोपरगाव बस आगार हे मध्यवर्ती बस आगार असुन या ठिकाणावरून मनमाड धुळे, नंदुरबार, अहिल्या नगर पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर अशी सर्वदूर जाणारी व्यवस्था आहे .त्यामुळे बस आगारात कायम गर्दी असते याचाच गैर फायदा चोरटे घेत असुन मागील अनेक दिवसापासून महिलांचे मौल्य वान दागिणे, पर्स पाकीट चोरी जाण्याच्या घटना घडत आहेत. ग्रामीण भागातून अनेक मुली महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ये जा करत असतात,त्याच प्रमाणे टवाळ मुले मुलींची आणि महिलांच्या छेड काढण्याच्या घटना घडत असतात .
पूर्वी कोपरगाव बस आगारात पोलीस चौकी होती तसेच बंदोबस्तासाठी पोलिस नेमलेले असत. तसेच बस आगारात लोखंडी पाईप बसवले असल्याने बस मध्ये चढण्यासाठी गर्दी होत नव्हती मात्र आता जास्त गर्दी होत असते त्यामुळे चोर या गर्दीचा गैर फायदा घेतात. मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना पाहता. चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सी सी टि व्ही कॅमेरे बसवणे व बंदोबस्तासाठी पोलिस नेमण्याची मागणी
लोक स्वराज्य आंदोलनाचे अॕड.नितीन पोळ यांनी केली आहे.






