banner ads

" बेकायदा धंद्यातून सूरू असणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालणार का?

kopargaonsamachar
0

 " बेकायदा धंद्यातून सूरू असणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालणार का?"



कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
नुकतीच बीड जिल्ह्यात सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची निर्घृण हत्या प्रकरण झाले असुन राजकिय वरद हस्त व बेकायदा धंद्यातून सदरची हत्या झाली असुन या हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. 
या पार्श्वभूमीवर अहिल्या नगरचे पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी एक सूचक वक्तव्य केले असुन स्थानिक पातळीवर बेकायदा धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न करावे अन्यथा पथक पाठवले जाईल 
कोपरगाव शहरात व तालुक्यांत अनेक बेकायदेशीर धंदे सूरू आहेत स्थानिक नागरीक व सामजिक संघटना या विषयावर वारंवार आवाज उठवतात. 


मात्र आजही शहरात विविध ठिकाणी जुगार,मटका,चकरी, बेकादेशीर रित्या गावठी व देशी विदेशी दारूची वाहतुक सूरू आहे.अनेक ठिकाणी सर्रास गांजा,चरस तसेच कुत्ता गोळी सारखे मादक पदार्थ विक्री केले जात आहेत.महिन्या दोन महिन्यातून गोवंश हत्येचा एखादा गुन्हा दाखल केला जात असतो. रेशन गोडवून मधून राजरोस तांदूळ रातोरात विक्री होत आहे.
गोदावरी नदी पात्रातून शासकीय वाळू ठेक्यावर कोणाचेही नियंत्रण राहिले नसून अनेक पोलीस व महसूल अधिकारी यात सामील आहेत त्यामुळेच बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांची थेट महसूल अधिकारी यांनाच लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याचा धाक दाखवून बेकादेशीर धंदे सूरु आहेत.
या बेकायदेशीर धंद्यात अनेक राजकीय नेत्यांचे हस्तक राजरोसपने सहभागी आहेत त्यांना राजकिय नेत्यांचा वरद हस्त असुन यातून अनेकदा किरकोळ चकमकी होत असतात मागील काही दिवसापूर्वी दिवसा ढवळ्या गोळीबाराची घटना घडली. त्यातील आरोपी स्थानिक नेत्यांचे जवळचे असल्याचे आरोप प्रत्यारोप झाले.मात्र त्यानंतर सर्व काही आलबेल असल्याचे दिसत असुन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा "तेरी भी चूप मेरी भी चूप" असे दिसते 
कोपरगाव शहर व ग्रामीण भागात सूरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांना राजकिय नेते व पोलीस आणि महसूल अधिकारी यांचा आशीर्वाद असल्याशिवाय ह्या धंद्यांचे पेव फुटले नाही त्यामुळेच पोलिस अधिक्षक साहेब यांनी स्थानिक पातळीवर या धंद्यांना आळा घातला नाही तर पथक पाठवणार असल्याचे जाहिर केले. बीड जिल्ह्यात झालेल्या घटनेत देखील राजकिय वरद हस्ता शिवाय एवढी भयानक व राज्याला हादरून सोडणारी घटना घडली नाही त्यामुळे अहिल्या नगरचे पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी केलेल्या सूचक वक्तव्याने खरचं बेकायदा धंद्यांना आळा बसेल का? कीपुन्हा राजाश्रय मिळणार ? असा सवाल लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष ॲड नितीन पोळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!