कोपरगांव आगारात बस पेटली
कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव बस डेपो आगारातील वर्क शाॕप ग्यारेज विभागात शिवशाही एस टी बस दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक बस मध्ये शॉर्ट सर्किट होऊन बसला भीषण आग लागली
या आगीत संपूर्ण बस जाळून खाक झाली .ही आग विझवण्यासाठी कोपरगाव नगरपालिका तसेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे स हकारी साखर कारखाना अग्निशामक दल घटनास्थळी येवून ही आग विझविण्याचा प्रयत्न करत ही आगटोक्यात आणली आहे .
कोणतीही जीवित हानी झाली नसून एस टी बसचे मोठे नुकसान झाले आहे यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती






