banner ads

मोर्विस (धामोरी फाटा) येथे उपबाजारास शासनाची मंजुरी सभापती . साहेबराव पा.रोहोम

kopargaonsamachar
0

 मोर्विस (धामोरी फाटा) येथे उपबाजारास शासनाची मंजुरी सभापती . साहेबराव पा.रोहोम

कोपरगांव :-लक्ष्मण वावरे

 कोपरगांव कृषि उत्पन्ऩ बाजार समितीचे मौजे मोर्विस (धामोरी फाटा) ता.कोपरगांव येथील उपबाजारास आमदार  आशुतोष काळे,   सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे , नामदेवरावजी आण्णा परजणे पाटील गोदावरी खोरे सहकारी दुध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे ,  पोहेगांव नागरी पतसंस्थेचे चेअरमन नितीन औताडे   यांचे प्रयत्नातून शासनाची मंजुरी मिळाली आहे.



कोपरगांव कृषि उत्पन्ऩ बाजार समितीचे कार्यक्षेत्रात रवंदे, मोर्विस, धामोरी, चास, कोळपेवाडी या 20 ते 25 गावांच्या परिसरात कांदा, भुसार व टोमॅटो या शेतीमालाचे उत्पादन मोठया प्रमाणात घेतले जाते. परंतु तेथील शेतक-यांना त्यांचा शेतमाल विक्री साठी जवळ बाजारपेठ नसल्यामळे शेतमाल विक्रीसाठी त्यांना 25 ते 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्केटवर जावे लागते. त्यामुळे शेतक-यांचा वाहतुक खर्च वाढतो व त्यांचा वेळही वाया जातो. याचा गैरफायदा घेऊन या परिसरात बाहेरील व्यापारी सोयाबीन, गहु, मका, कांदा काढण्याच्या वेळी शेतक-यांच्या वजनमापात 1 ते 2 किलोचा नियमबाहय काटला घेतात. शेतक-यांची भावात व पेमेंटमध्ये ब-याच वेळा फसवणुक केली जाते. परिसरातील शेतक-यांची वजनमापाची व भावाची फसवणुक टाळण्यासाठी कृषि उत्पन्ऩ बाजार समितीचे संचालकमंडळाने निर्णय घेऊन मौजे मोर्विस (धामोरी फाटा) ता.कोपरगांव या ठिकाणी उपबाजार सुरू करणेसाठी शासनास प्रस्ताव पाठवला होता.सदर ठिकाणी उपबाजार सुरू करण्यास शासनाने परवानगी दिल्याची माहिती बाजार समितीचे सभापती . साहेबराव पा. रोहोम व उपसभापती गोवर्धन पा.परजणे यांनी दिली आहे. यामुळे परिसरातील शेतक-यांना व व्यापा-यांना शेतमाल खरेदी विक्रीस आणण्यासाठी अंतर कमी होवुन त्यांच्या वेळेत व खर्चात बचत होईन. तसेच परिसरातील शेतमाल खरेदी विक्रीचे अनधीकृत व्यवहारास प्रतीबंध बसेल. मौजे  मोर्विस (धामोरी फाटा) उपबाजाराचे ठिकाण हायवे लगत असल्याने उपबाजारामध्ये शेतक-यांना शोतमाल आणणे सोईचे होईल. शेतक-यांची उपबाजार सुरू करण्याची मागणी पुर्ण झालेली असुन याचा फायदा शेतक-यांना होणार आहे. यामुळे परिसरातील शोतक-यांचा शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. सदर उपबाजार आवाराचे उद्घाटन लवकरात लवकर होणार आहे.

उपबाजार आवार मोर्विस (धामोरी फाटा) ता.कोपरगांव या ठिकाणी बाजार समितीला कांदा, भुसार व टोमॅटो या शेतीमालाचे लिलावाचे कामकाज सुरू करायचे असुनन खरेदीदार व आडते व्यापारी यांना व्यापाराच्या परवान्यासाठी बाजार समितीच्या अटी व शर्तीनुसार नविन आडते व खरेदीदारासाठी लायसेन्स़ द्यावयाचे असुन त्यासाठी इच्छुक / उत्सुक असणा-या व्यापारी बांधवांनी कृषि उत्पन्ऩ बाजार समिती, कोपरगांव ता.कोपरगांव जि.अहिल्यानगरच्या मुख्य़ कार्यालयात नवीन लायसेन्स़ मिळणे बाबत लवकरात लवकर संपर्क साधावा असे आवाहन बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशुर यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!