banner ads

गटविकास अधिकारी संदीप दळवी यांची रवंदे शाळेला अचानक भेट

kopargaonsamachar
0

 गटविकास अधिकारी संदीप दळवी यांची रवंदे शाळेला अचानक भेट


कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )

पी .एम. श्री . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रवंदे शाळेला कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी अचानक भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी शाळेची सखोल माहिती घेतली शिक्षकांची हजेरी , टाचण वही, विद्यार्थी हजेरी , विद्यार्थी उपस्थिती यांची तपासणी केली. शाळेत एक शिक्षक रजेवर तर उर्वरित सर्व शिक्षक हजर असल्याचे दिसून आले. 


मध्यान भोजनाची सुट्टी असल्याने गट विकास अधिकारी संदीप दळवी यांनी शालेय पोषण आहाराची चव घेऊन समाधान व्यक्त केले शाळेतील विविध समित्यांची माहिती घेतली. शौचालय परसबाग पाहून समाधान व्यक्त केले शाळेत बसविलेल्या इंटरऍक्टिव्ह बोर्ड ची पाहणी करून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना ते हाताळावयास लावले विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्याशी हितगुज केली. शाळेच्या काही अडचणी असल्यास ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून देण्याचे संदीपजी दळवी यांनी मुख्याध्यापक प्रभाकर कदम यांना सांगितले. सीसीटीव्ही बसविल्याबाबत शाळेचे कौतुक केले .ग्रामपंचायत रवंदे अंतर्गत विविध विकास कामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले . गटविकास अधिकारी  संदीप दळवी यांचे वडीलांनी प्राथमिक शिक्षक तसेच मुख्याध्यापक या पदावर अनेक वर्ष आदर्शवत काम पाहिले माझ्या वडिलांसारखेच काम इतरही शिक्षकांनी करावे असे मत त्यांनी सर्व शिक्षकांसमोर व्यक्त केले शाळेचा आपल्याला का लळा आहे हे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून आले. शाळेचा परिसर व गुणवत्ता पाहून समाधान व्यक्त केले. त्यांच्या समवेत रवंदे गावचे ग्रामविकास अधिकारी  राजेंद्र बागले हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!