कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांचे जीवन सर्वांग सुंदर व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा प्रयत्न करत आहे याचाच एक भाग म्हणून ग्रामस्थांच्या सहकार्याने व कोपरगांव च्या गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध गुणदर्शन स्पर्धेत १३ पारितोषिके पटकावत केंद्रात अव्वल ठरलेल्या जि.प.शाळा टाकळी शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन गावचे प्रथम नागरिक सरपंच संदीप देवकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी गावचे प्रतिष्ठित व शिक्षण प्रेमी नागरिक छगन नाना देवकर एसएमसी चे अध्यक्ष संदीप देवकर सदस्य स्नेहल गायकवाड ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब गुंड शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कांता देवकर सर्व शिक्षक वृंद पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार व गुणगौरव करण्यात आला मुख्याध्यापिका व शिक्षकांच्या कामाचा झंजावत विद्यार्थी गुणवत्तेचा चढता आलेख हे नक्कीच गावासाठी अभिमानास्पद असल्याचे आपल्या मनोगतातुन शाळेचे कौतुक व अनमोल मार्गदर्शन मान्यवरांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका कांता देवकर यांनी केले व सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक रणधीर यांनी केले.





