कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगांव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या केंद्रस्तरीय स्पर्धा रवंदे येथे घेण्यात आल्या या विविध गुणदर्शन स्पर्धेत एकूण अठरा शाळांनी सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलाविष्कार सादर केला यात बनकरवस्ती ब्राह्मणगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी नेञदिपक कामगीरी करत केंद्रात शाळेचा डंका वाजविला व वेशभूषा सादरीकरणात अर्पिता बाळासाहेब केकाण हिने प्रथम क्रमांक , हस्ताक्षर स्पर्धेत तेजस किरण बनकर प्रथम क्रमांक व गोष्ट सादरीकरण स्पर्धेत कार्तिक माळी तृतीय क्रमांक मिळविला.
इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आजच्या युगातील पिढी मोबाईल शिवाय जीवन नाही तसेच मोबाईलचा अतिवापर व्हाटसॲप फेसबुक इन्स्टाग्रॉम ,टिकटॉक ,गुगल ,यूट्यूब यांचा अतिवापर यावर आधारित नाटीका सादरीकरण केले . स्वरा सोनवणे हिने अहिल्यादेवी होळकर यांची वेशभूषा सादरीकरण केले तर साई सांगळे याने माझा आवडता प्राणी ससा या वकतृत्व विषयावर सुंदर भाषण केले यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधीकारी शबाना शेख सह शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,सदस्य, मुख्याध्यापक,वर्ग शिक्षकांनी कौतुक केले





