banner ads

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अभिवादन

kopargaonsamachar
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना  राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अभिवादन


कोपरगांव  :- लक्ष्मण वावरे दि.६ डिसेंबर २०२४

 समतेचा आदर्श उभारणारे, दलित, शोषित, पीडित वर्गांसाठी जीवन समर्पित करणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजाच्या शिक्षण, स्वातंत्र्य आणि समानतेसाठी संघर्ष केला. त्यांच्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी आणि त्यांच्या आदर्शांवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी आपले सर्वस्व समर्पित करणे आवश्यक आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने समतेचा आणि बंधुत्वाचा संदेश दिला असून आजच्या काळात त्यांची शिकवण अधिक महत्त्वाची आहे. त्यांनी दिलेली शिकवण प्रत्येक भारतीयासाठी एक प्रेरणा असून त्यांच्या विचारांचे पालन करणे हि खरी त्यांना आदरांजली ठरेल अशा शब्द सुमनांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते तसेच भीम अनुयायी  मोठ्या संख्येने उपस्थित होते
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!