banner ads

संकट काळात विमा रक्कमेचा मोठा आधार - ज्ञानदेव औताडे

kopargaonsamachar
0
संकट काळात विमा रक्कमेचा मोठा आधार - ज्ञानदेव औताडे 



कोपरगांव : लक्ष्मण वावरे   दि. ५ डिसेंबर २०२४- 


             संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक  कोल्हे यांनी उस उत्पादक सभासद शेतकरी व कामगारांसाठी जनता अपघात विमा उतरविला असुन संकट काळात विमा रक्कमेचा मोठा आधार असल्याचे प्रतिपादन संचालक ज्ञानदेव पाराजी औताडे यांनी केले. 
            सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या केनयार्ड विभागाचे कर्मचारी संजय बाबुराव देशमुख यांचा ५ ऑगस्ट २०२३ मध्ये रस्ते अपघातात मृत्यु झाला होता, त्यांच्या वारस पत्नी श्रीमती बेबीता संजय देशमुख यांना न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीकडुन दोन लाख रूपयांचा विमा धनादेश संचालक ज्ञानदेव औताडे, संजय औताडे, रमेश आभाळे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते. 
          ज्ञानदेव औताडे पुढे म्हणाले की, आपत्ती कधी येईल हे सांगता येत नाही, त्यासाठी प्रत्येकांने विमा घेतला पाहिजे. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची दुरदृष्टी म्हणून त्यांनी कारखान्यांच्यावतीने उस उत्पादक सभासदांसाठी जनता अपघात विमा उतरविला त्याचा संकटकाळात अनेकांना लाभ मिळाला. कारखान्याचे युवानेते विवेक कोल्हे यांनी याकामी न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीकडे पाठपुरावा करत वारसाकडुन आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता वेळेत करून घेतली त्यानंतर त्यांना इंशुरन्स कंपनीकडुन २ लाख रूपयांचा अपघाती विमा मंजुर झाला. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी देशमुख परिवारास कशाचीही उणीव भासु न देता सतत सहकार्य केले असे बेबीता संजय देशमुख म्हणाल्या. शेवटी ईश्वर संजय देशमुख यांनी आभार मानले
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!