banner ads

तर कोपरगांवची बाजारपेठ अधिक गतिमान होणार - विवेक कोल्हे

kopargaonsamachar
0
तर कोपरगांवची बाजारपेठ अधिक गतिमान होणार - विवेक कोल्हे 



कोपरगांव ः लक्ष्मण वावरे दि.९ डिसेंबर २०२४


जर शेतकरी सुखी झाला तर बाजारपेठ फुलत असते. पाणी ही सर्वात मोठी समस्या अलीकडच्या काळात झाली आहे त्यावर मात करून पश्चिमेचे पाणी जर पूर्वेकडे वळवले तरच हा प्रश्न सुटून कोपरगावची बाजारपेठ गतिमान होणार आहे ही दूरदृष्टी अनेक वर्षांपूर्वी स्वर्गीय कोल्हे साहेब यांना होती त्या विषयाला काही प्रमाणात यश आले आहे. सामूहिकरीत्या स्थानिक व्यापाऱ्यांना आपण सर्वांनी प्राधान्य देणे ही ग्राहक म्हणून आपली देखील जबाबदारी आहे. सत्तर हजारहून अधिक ग्राहकांनी या योजनेत सहभाग घेतला यामुळे येणाऱ्या काळात अर्थचक्र फिरण्यास मदत होईल
 असे मत सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले

कोपरगांवातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक बाजारपेठेत ग्राहकांनी खरेदी करावी म्हणून संजीवनी उद्योग समूह व कोसाका उद्योग समूहाच्या सहकार्याने कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांनी राबविलेली ग्राहक सन्मान योजनेचे भाग्यवंत ग्राहकांना पारितोषक देण्यात आले. त्याप्रसंगी  युवानेते विवेक कोल्हे मार्गदर्शन करताना बोलत होते.

या प्रसंगी प्रियदर्शनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे,राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे ,उद्योजक अरविंदशेठ भन्साळी,संजयराव भन्साळी,औद्योगिक वसाहत व्हा.चेअरमन केशवराव भवर,अजितशेठ लोहाडे ,राजेंद्रजी बंब, नारायणशेठ अग्रवाल,पटवर्धन साहेब,बबलूशेठ वाणी, विनोद राक्षे,तुलसीदासशेठ खुबाणी,संतोषजी गंगवाल आदीसह पारितोषक विजेते मान्यवर,व्यापारी बांधव आणि नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
पुढे बोलताना कोल्हे म्हणाले की
धूळ आणि गुळ अशी ओळख असणारा कोपरगाव गुळाची बाजारपेठ तर आता कमी झाली आहे मात्र धुळ अद्यापही तशीच असल्याने त्यावर काम करण्याची गरज आहे. लहान मोठ्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक बाजारपेठेत ग्राहकांनी खरेदी करावी म्हणून संजीवनी उद्योग समूह व कोसाका उद्योग समूहाच्या सहकार्याने कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांनी राबविलेली ग्राहक सन्मान योजनेचे भाग्यवंत ग्राहकांना पारितोषक देण्यात आले. ही योजना खऱ्या अर्थाने ग्राहकांबरोबरच बाजारपेठेचा ही सन्मान करणारी योजना असुन काका कोयटे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जी मोहीम हातात घेतली ती निश्चितच कौतुकास्पद आहे. आपल्या युवकांची बुद्धिमत्ता ही आपल्या बाजारपेठेत नाविन्यपूर्णता आणण्यासाठी उपयुक्त ठरायला हवी त्याचा फायदा बाहेर होण्यापेक्षा आपल्या शहर आणि गावासाठीच कसा होईल या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.

काळाची पाऊले ओळखून जर आपण बदल केले तर प्रवाहासोबत आपण टिकतो. विविध संस्थांच्या माध्यमातून स्वर्गीय शंकरावजी कोल्हे साहेब व स्वर्गीय काळे साहेब या दोघांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्याच विचारांवर सोनेवाडी येथील एमआयडीसीसाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही प्रयत्न केले त्याला यशही आले तसेच रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आपण हजारो युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला कोपरगावमधील उच्चशिक्षित तरुण हे परदेशामध्ये स्थायिक होतात. मोठ्या पगाराच्या नोकरी अनेक युवकांना उपलब्ध झाल्या मात्र त्यांनी सण-उत्सवाची खरेदी आणि दैनंदिन किराण्याची खरेदी देखील सुट्टीला आल्यानंतर कोपरगावमध्येच करून ती घेऊन जावी ज्यामुळे बाजारपेठेत हातभार लागेल. कोपरगाव एमआयडीसी मध्ये स्थानिक व्यापाऱ्यांना कमी पैशात जागा उपलब्ध व्हाव्या यासाठी आपणा सर्वांसमवेत प्रयत्न करण्यासाठी मी कटिबद्ध राहील. जर बाजारपेठ चांगली असेल तर पर्यायाने आपल्या शहर आणि तालुक्याचे नाव हे बाहेर अधिक अभिमानाने घेतले जाते तसे काम करू अशी अपेक्षा शेवटी कोल्हे यांनी व्यक्त केली

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!