banner ads

विकास कामे होऊन देखील शरद पवारांची सभा ठरणार निर्णायक

kopargaonsamachar
0
विकास कामे होऊन देखील शरद पवारांची सभा ठरणार निर्णायक

[ लक्ष्मण वावरे ]
कोपरगाव- कोपरगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचाराचा रंग चढायला सुरुवात झाली असून यावेळी काळे कोल्हे असा थेट सामना नसला तरी सध्या धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी चर्चा जोर धरू लागली आहे. या अगोदरही अशा परिस्थितीमध्ये अनेक वेळा धक्कादायक निकाल लागल्याचे कोपरगावकरांनी बघितले आहे. यावेळेस देखील या निकालाची पुनरावृत्ती होणार का ? की आशुतोष काळे हे पाच वर्षात केलेल्या  विकास कामांच्या जोरावर एकतर्फी विजय मिळवणार हे राष्ट्रवादी काॕग्रेस शरद पवार पक्षाचे  सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कोपरगांव मतदार संघातील होणाऱ्या संभाव्य सभेनंतरच कळणार असुन विकास कामे होऊन देखील शरद पवारांची सभा कोपरगांव मतदार संघाच्या राजकारणात  निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

पाच वर्षात सार्वजनिक विकास कामांबरोबरच व्यक्तिगत विकासाची कामे मोठ्या प्रमाणात झाली लाडकी बहीण योजना घराघरात पोहोचवली, दिव्यांग बांधवांच्या अडचणी दूर करण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आवश्यक सुविधा पुरविल्या यापुढे देखील विकासाबरोबरच जनसेवा सुरूच राहणार असून विकास आणि जनसेवेतून मला मतदार संघातील जनता पुन्हा आशीर्वाद देईल हा विश्वास काळेंना लीड मिळवून देणार का.
ज्या शरद पवारांनी साईबाबा संस्थान च्या अध्यक्ष पदा सह रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग अध्यक्ष पदासह महत्वाची पदे देऊन २०१९ च्या निवडणुकीत मतदार संघात सभा घेऊन निसटता का होईना ८४० मतांनी विजय मिळवून दिला त्याच शरद पवार साहेबांना ऐंन मोक्याच्या वेळी साथ न देता त्यांच्या विरोधात भूमिका घेत विकासासाठी साथ सोडली 
 असे असताना देखील मतदार संघामध्ये अनेक गाव व त्या वाड्यांवर प्रामुख्याने रस्त्याचा शेतीच्या पाण्याचा रोजगारीचा प्रश्न व तसेच उध्वस्त झालेली बाजारपेठ त्यामुळे आज देखील ग्रामीण भागातील जनतेमध्ये मोठी उदासीन भूमिका बघायला मिळत असल्याचा प्रचार सभेंमधुन शरद पवार यांचे खंदे समर्थक संदिप वर्पे करत असलेला प्रचार यावरुन कोणाचा मुद्दा मतदांरांना भावतो हे आगामी काळच ठरवेल
 कोपरगाव मध्ये पुन्हा एकदा मागील अशाच परिस्थितीमध्ये अतिशय सर्वसामान्य असलेले माजी खासदार स्वर्गीय भीमराव बडदे यांचा झालेला विजय त्याचप्रमाणे काळे कोल्हे यांच्या पुढे नगरपालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या  लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांच्या झालेल्या विजयाची पुनरावृत्ती होणार का? कारण देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांची कोपरगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये आगामी काळामध्ये जर निवडणूक प्रचारार्थ सभा झाली तर याचा निश्चित परिणाम बघायला मिळेल असे चित्र निर्माण झाले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!