banner ads

कोपरगावकरांचा कौल विकासाला कि परिवर्तनाला !

kopargaonsamachar
0

 कोपरगावकरांचा कौल विकासाला कि परिवर्तनाला !

[ लक्ष्मण वावरे ]

 कोपरगाव प्रतिनिधी - कोपरगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये  सुरुवातीपासूनच  विविध राजकिय घडामोडी घडत आल्या मतदारसंघां मधील पारंपारिक विरोधक काळे व कोल्हे यांच्यातच  जोरदार लढत होईल असा अंदाज असतानाच कोल्हेनी अचानक निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली.कोल्हे यांच्या माघारीमुळे काळे आणि कोल्हे या पारंपारिक  राजकीय घरान्यांची लढत होणार नसल्याने कोपरगाव मधील चुरस काहीशी कमी झाली होती माञ अशक्य ते शक्य  करण्यात माहीर असलेल्या शरद पवार राष्ट्रवादी काॕग्रेसने या मतदार संघात तुतारी फुंकत आपला उमेदवार  दिल्याने एकतर्फी वाटणारी निवडणूक " काटेकी टक्कर " होणार असल्याचे संकेत देत चांगलीच रंगत आणली.

     या मतदार संघात दाखल अर्जापैकी मतदार संघाचे विद्यमान लोकप्रतिनिधी आशुतोष काळे यांनी महायुती तुन राष्ट्रवादी अजितदादा पवार गट या पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर महाविकास आघाडी तील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाकडून संदीप वर्पे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ,दाखल अर्जांपैकी  उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सात उमेदवारांनी माघार घेल्याने एकूण १२ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात राहिले आहेत.  कोपरगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूणच राजकीय परिस्थिती सध्या बदललेली दिसत आहे कोल्हे यंदा निवडणुकीच्या रिंगणात नाही तर आमदार आशुतोष  काळे यांच्या विरोधामध्ये सर्वसामान्य उमेदवार उभे टाकले आहेत  


सध्या महाराष्ट्रामध्ये ठीक ठिकाणी अजित दादा पवार गटाच्या उमेदवारांच्या विरोधामध्ये शरद पवार गटाचे उमेदवार असा सामना रंगतदार होणार आहे,, विविध ठिकाणी अजित दादा पवार गटाच्या उमेदवारांना प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून शरद पवारांनी मोर्चे बांधणी करत आपले उमेदवार दिले आहे,, महाराष्ट्रामध्ये महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी रंगत निवडणुकीत होणार आहे त्याचप्रमाणे कोपरगाव विधानसभा मतदारसंघांमध्येही राष्ट्रवादी अजित दादा गटाचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या विरोधामध्ये संदीप वर्पे यांना उमेदवारी मिळाली आहे ,, संदीप वर्पे यांनी उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक व काँग्रेसचे कार्यकर्ते ,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते यांची मोट बांधली असल्याची दिसत आहे, तर दुसरीकडे आमदार आशुतोष काळे यांनी गेल्या एक महिन्यापासूनच तालुका पिंजून काढत मतदारांपर्यंत ते पोहोचले आहे ,संदीप वर्पे यांना तालुक्यातील विविध गावा गावात असलेल्या शिवसैनिकांकडून मदत होणार असल्याचे बोलले जात आहेत ,

 कोपरगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये काळे विरुद्ध कोल्हे असा परंपरागत लढत होणार अशी चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळाली ,काळे विरुद्ध कोल्हे अशी चुरस यावर्षी बघायला मिळणार नाही, त्यामुळे कोल्हे यांचे कार्यकर्ते कोणाला मतदान करणार , कोल्हे यांच्याकडून कार्यकर्त्यांना काय आदेश दिला जातो, यावर उलट सुलट चर्चा सध्या तालुका भर ऐकायला मिळत आहे, तर काही ठिकाणी आशुतोष काळे यांना ही निवडणूक सोपी असल्याचे बोलले जात आहे, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाकडे ज्येष्ठ नेते शरद पवार किती लक्ष देतात यावर कोपरगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक कोणाला सोपी जाईल याचा अंदाज लावता येईल ,एकंदरीतच काळे यांनी ३ हजार कोटींचा निधी तालुक्याला आणत  गावागावात रस्ते, वीज, पाणीपुरवठा योजना केल्या ,तसेच शहराचा अत्यंत बिकट असलेला प्रश्न म्हणजेच पिण्याचे पाणी यासाठी पाच नंबर तळे बांधून प्रत्यक्षात तीन दिवसाआड पाणी करून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवला असल्याचा दावा करत आहे.  ,,याचा फायदा त्यांना निवडणुकीमध्ये होईल का,की शरद पवार गटाचे उमेदवार असलेले संदीप वर्पे अथवा सामाजिक कार्यकर्ते संजय काळे व इतर उमेदवार याना परिवर्तनाच्या रूपाने मतदार किती मते पदरात टाकतील हे सध्या तरी अस्पष्ट आहे ,

महाविकास आघाडी कडून उमेदवारी करत असलेले संदीप वर्पे  हे शरद पवार यांचे जवळचे मानले जातात जर वर्पे  यांच्या प्रचारार्थ  शरद पवार यांची सभा कोपरगाव मध्ये झाली तर विधानसभा मतदारसंघात वातावरण बदलू शकते अशी चर्चा सध्या कोपरगाव तालुक्यात सुरू आहेत,आता आमदार काळें नी विकास कामा साठी आणलेला 3 हजार कोटीचा निधी,मतदारसंघात दांडगा जनसंपर्क कोपरगाव शहरातील सोडवलेला पाणी प्रश्न ह्या सगळ्या विकास कामाला मतदार मतदानाच्या रुपात कामाची पावती आमदार काळें ना देता की राज्यात झालेल्या राजकिय बदलाचे मुद्द्यांवर परिवर्तनकडे निवडणूक होईल ह्या कडे तालुक्या  सहित महाराष्ट्राचे लक्ष लागून आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!