banner ads

जंतर-मंतरवरील आंदोलनाला कोपरगाव 'माझा गाव माझा अभिमान' संघटनेचा पाठिंबा

kopargaonsamachar
0

 जंतर-मंतरवरील आंदोलनाला कोपरगाव 'माझा गाव माझा अभिमान' संघटनेचा पाठिंबा

कोपरगाव समाचार - : दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर देशातील विद्यार्थ्यांच्या व युवकांच्या न्याय्य मागण्यांसाठी आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये संपूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी 'परीक्षा सुधारणा आंदोलन' अत्यंत तीव्रतेने सुरू आहे. या देशव्यापी आंदोलनाला 'माझा गाव माझा अभिमान' कोपरगाव या संघटनेच्या वतीने आणि कोपरगाव तालुक्यातील नागरिकांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे.



या संदर्भात संघटनेच्या वतीने भारताचे राष्ट्रपती यांना कोपरगावचे तहसीलदार आणि शिर्डीचे प्रांत अधिकारी यांच्यामार्फत एक अधिकृत मागणीचे निवेदन सादर करण्यात आले आहे.दिल्लीत सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लागले आहे. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या या न्याय्य मागण्यांचा अत्यंत सहानुभूतीपूर्वक विचार करून, संपूर्ण शिक्षण व परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी तातडीने ठोस व सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी 'माझा गाव माझा अभिमान' संघटनेने या निवेदनाद्वारे केली आहे.




या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन या निवेदनाच्या पंतप्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री , शिर्डी लोकसभा क्षेत्राचे खासदार कोपरगाव विधानसभा क्षेत्राचे लोकप्रतिनिधी यांनाही माहिती व त्वरित कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांचे हित हेच देशाचे हित आहे, त्यामुळे त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष न करता सरकारने त्वरित पावले उचलावीत, अशी ठाम भूमिका संघटनेच्या वतीने मांडण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!