banner ads

कोपरगावच्या भारूड कलेचा झी टॉकीजवर झंकार

kopargaonsamachar
0

 कोपरगावच्या भारूड कलेचा झी टॉकीजवर झंकार; बैरागी परिवाराची हॅट्ट्रिक!

'आपली माणसं... आपली गोष्ट'मध्ये झळकणार कोपरगावचे भारूड कलाकार
कोपरगाव समाचार : सह्याद्री झी टॉकीजवरील 'आषाढी वारी विशेष' कार्यक्रमात कोपरगावच्या भारूड कलाकारांनी आपल्या प्रभावी सादरीकरणातून सांस्कृतिक ठसा उमटविला आहे.
'मन-मंदिरा गजर भक्तीचा' या कीर्तन मालिकेतील 'आपली माणसं... आपली गोष्ट' या विशेष भागात भानुदास बैरागी, रामेश्वर बैरागी व त्यांच्या सहकाऱ्यांचे संत एकनाथी भारूड तसेच विशेष मुलाखत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.




हा कार्यक्रम दि. १३, १४ आणि १५ जुलै रोजी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत प्रसारित होणार असून, सलग पाचव्या वर्षी कोपरगावच्या कलाकारांना या व्यासपीठावर सादरीकरणाची संधी मिळाली आहे.




या कार्यक्रमात भानुदास बैरागी, रामेश्वर बैरागी, नंदा बैरागी, कविता बैरागी, ओम बैरागी, भक्ती बैरागी, मयुरी बैरागी, शैलेश बैरागी, पत्रकार सचिन बैरागी, रामेश्वर बंसीदास बैरागी, शरद नाना आहिरे, कैलास महाराज आगवण, अलका आगवण, रत्नाकर जंगम, संतोष मुरडनर, राधाकिशन गाडेकर, अनिल गाडेकर आणि रमेश भोसले यांनी सहभाग नोंदविला आहे.


कोपरगावच्या लोककलेचा वारसा राज्यभर पोहोचविणाऱ्या या सादरीकरणाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!