banner ads

मलाही पस्तीस वर्षे सत्ता द्या, कोपरगाव मतदारसंघ मॉडेल करीन

kopargaonsamachar
0

 मलाही पस्तीस वर्षे सत्ता द्या, कोपरगाव मतदारसंघ मॉडेल करीन -- आ.आशुतोष काळे


कोपरगाव समाचार :- मी विकास कामांना प्राध्यान्य देणारा आमदार आहे. निव्वळ बडबड करून नादी लावणारा नाही. मतदार संघाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा माझा ध्यास आहे.गेल्या सहा वर्षात आपण माझे काम पाहिले आहे. काम करतो त्याच्या पाठीशी उभे रहा. त्यांना दिले तसे पस्तीस वर्ष मला द्या एकही विकास काम शिल्लक ठेवणार नाही. एक मॉडेल मतदारसंघ म्हणून कोपरगावची ओळख निर्माण करीन .




बारा वर्षांपूर्वी जे लोकप्रतिनीधी लाटे मुळे निवडून आले त्यांना विकास कामे करता आली नाहीत. त्यामुळे वारी कान्हेगाव पुलाचे काम रखडले अन रस्ते खड्ड्यात गेले.  त्यामुळे या महत्वाच्या गावाची अवस्था बेटा सारखी झाली होती. मला लोकप्रतिनीधी म्हणून संधी मिळताच सुमारे वीस कोटी रूपये निधी मिळवून येथील पुलाचे काम करून दाखवीले. या गावाला जोडणारे चारही बाजूंचे रस्ते भक्कम केले. एका अर्थाने आपण माजी आमदार अशोकराव काळे यांचे स्वप्न पूर्ण केले असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.



त्यांच्या पुढाकारातून गोदावरी नदीवर वारी कान्हेगाव येथे उभारलेल्या पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रामनाथजी कारवा होते. यावेळी सोमय्या केमिकल्सचे कार्यकारी संचालक सुहास गोडगे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, संचालक सुधाकर रोहम, दिलीपराव बोरनारे, प्रशांत घुले, श्रावण आसने, सुरेश जाधव, जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर टेके, गौतम बँकेचे उपाध्यक्ष विजयराव रक्ताटे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वारी येथे आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून मिळालेल्या बंदिस्त व्यायाम शाळेचेही लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. पोलिओ केंद्रावर आलेल्या बालकांना पोलिओ डोस देऊन या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.




आ.काळे म्हणाले, स्व.कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांचे संसदेतील मित्र केंद्रीय रस्ते राज्यमंत्री मुनी यप्पा यांच्या सहकार्याने माजी आमदार अशोकराव काळे यांनी २००४ ते २०१४ या दहा वर्षात विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील गोदावरी नदिवर पुलांची मालिका उभारली. त्यात धारणगाव-कुंभारी, चास नळी, कोपरगाव शहर व बेट,राज्य मार्ग ७ वरील देर्डे फाटा, तसेच सावळीविहीर-भरवस रस्त्यावरील सातमो-याजवळ, झगडे फाटा येथे, धामोरी रस्त्यावरील कुर्ला नाल्यावरील पूल अशा अनेक छोट्या मोठ्या पुलांचा समावेश आहे. त्यावेळी मागे राहिलेला वारी कान्हेगावचा पुल आता पूर्ण झाला. चाळीस वर्षांपासून प्रलंबीत महत्वाचा प्रश्न सुटला. येथील सबस्टेशनची क्षमता पाच एमव्हीएवरून दहा एमव्हीए केली. शेतीला आणि घरगुती वीज ग्राहकांना देखील पुर्ण दाबाने वीज मिळू लागली.श्रीरामेश्वर देवस्थानला ‘क’ वर्ग दर्जा मिळवून देवून विकास कामांना ६५ लाख रूपयांचा निधी दिला.




यावेळी गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे संचालक विजयराव थोरात, जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे संचालक महेश लोंढे, नामदेव जाधव, वाल्मिक जाधव, नवनाथ जाधव, रावसाहेब टेके, सरपंच सौ.योगिताताई जाधव, उपसरपंच विजयराव गायकवाड, आदी मान्यवरांसह वारी, कान्हेगाव, सडे, शिंगवे, पुणतांबा, भोजडे आदी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!