banner ads

एकोणावीसाव्या वर्षीच विद्यार्थी कमावते झाल्याने पालक सुखावले

kopargaonsamachar
0

 

एकोणावीसाव्या वर्षीच विद्यार्थी कमावते झाल्याने पालक सुखावले


कोपरगांव समाचार :-- संजीवनी के.बी.पी.पाॅलीटेक्निकच्या एकाचवेळी त्रेपन्न विद्यार्थ्यांची  अद्विक हाय-टेक कंपनीत नोकरीसाठी निवड झाली. वयाच्या अवघ्या एकोणावीसाव्या वर्षी हे सर्व विद्यार्थी कमावते झाले. त्यामुळे पालक सुखावले आणि विध्यार्थ्यांच्या करिअरला देखील चांगल्या पध्दतीने सुरवात झाली. ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट (टी अँड  पी) विभाग विद्यार्थ्यांवर  मेहनत घेतो. त्याचवेळी औद्योगिक जगतासोबत संपर्क ठेवतो, त्याचे हे फलीत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी हे समिकरण सार्थ ठरते आहे. या सर्व विध्यार्थ्यांना  या कंपनीने आकर्षक पॅकेज दिले आहे.



         या कंपनीने निवड केलेल्या विद्यार्थ्यांत  मेकॅट्राॅनिक्स विभागाच्या २३ विद्यार्थ्यांमध्ये  कृष्णा अष्टेकर, संकेत भरड, श्रध्दा डेंगळे, लकी फाटके, रोहीत गटकल, अंकिता जमधडे, सर्वज्ञ जोशी, कुणाल कोळपे, महेश  भालेराव, तनिष्का  म्हैस, मुकेश  शर्मा, दिशा नेहे, साक्षी पठारे, प्राची कोल्हे, प्रणव इखे, प्रणव तुपे, शुभदा शेलार, अथर्व सोनवणे, तेजश्री जेजुरकर, गौरव तिवारी, विशेष  पानगव्हाणे, शशांक  वावरे व संस्कार दळवी यांचा समावेश  आहे.


 इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या 30 विद्यार्थ्यांची   निवड झाली. यात वैभव शिंदे, श्रध्दा अहिरे, अभिषेक  कुमार, माधव कताडे, कार्तिक लांडे, शाम  बेलदार,उत्कर्षा  देवकर, अंकिता खंडागळे, भाग्येश  लोडे, मणिश वैद्य, अविनाश  रानोडे, सार्थक लोंढे, शुभम  शिंदे, तनवी दवंगे, प्रज्ञा फोपसे, मानसी म्हैस, युवराज पिंपरकर, खुशी शेजवळ , अनुराज सोळस, आदित्य ठुबे, सौरभ सिनगर, तनवी गिते, प्रतिक वाकचैरे, अबनिश  कुमार, अनुराधा साळुंके, साक्षी पोपळघट, प्रतिक्षा म्हस्के, उमेश  गायकवाड, बाळासाहेब इथापे व मोहम्मद समिर अलि यांचा समावेश  आहे.
    संस्थेचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे आणि कार्यकारी विश्वस्त  अमित कोल्हे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा  सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर आदि उपस्थित होते


 मी ग्रामीण भागातील मर्यादित उत्पन्न असलेल्या कुटूंबातील विद्यार्थी. संजीवनीत करिअर घडेल असा आई वडीलांना विश्वास होता. तो आज प्रत्यक्षात साकार झाला. माझ्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने आम्हा सर्व विद्यार्थ्यांवर  घेतलेली मेहनत कामी आली.   मला मेकॅट्राॅनिक्स शाखेत प्रवेश मिळाला आणि तेथूनच करिअरचा मार्ग सुकर  झाला. संजीवनीमुळे हे शक्य झाले.
 -
विशेष पानगव्हाणे (विद्यार्थी)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!