गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्काराने निलेश भाकरे सन्मानित
कोपरगाव समाचार -: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) यांच्या नाशिक परिमंडळाच्या वतीने
कोपरगाव (ग्रामीण) येसगाव कक्षाचे वरिष्ठ तंत्रज्ञ निलेश सर्जेराव भाकरे यांना महाराष्ट्र दिनानिमित्त सन २०२५-२६ चा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या हस्ते देण्यात आला.
महावितरण कंपनीच्या कामकाजात निलेश भाकरे यांनी सातत्याने प्रामाणिकपणे आणि कुशलतेने काम करत उल्लेखनीय योगदान दिले आहे. वीज वितरण व्यवस्थेतील अडचणी सोडविणे, ग्राहकांना वेळेवर सेवा देणे तसेच तांत्रिक बाबींमध्ये अचूकता राखणे या बाबींमध्ये त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. . हा पुरस्कार लाईन स्टाफसाठी सब-डिव्हिजनमधून एका उत्कृष्ट कर्मचाऱ्यास दिला जातो.
त्यांच्या कार्यतत्परतेमुळे विभागाच्या प्रगतीला चालना मिळाली असून सहकाऱ्यांसाठी ते प्रेरणादायी ठरले आहेत.जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा सन्मान करण्यात आला असून, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले आहे. भविष्यातही कंपनीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ते याच समर्पणाने काम करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
हा सन्मान मिळाल्याबद्दल कोपरगाव परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सहकारी कर्मचारी, मित्रपरिवार व नातेवाईकांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी यश चिंतले आहे.








