banner ads

आजोबानंतर नातवांने विधीमंडळाचा वारसा सुरू केला-- परजणे.

kopargaonsamachar
0

 

आजोबानंतर नातवांने विधीमंडळाचा वारसा सुरू केला-- परजणे.

कोपरगांव समाचार:-  कोपरगांव विधानसभा मतदार संघाच्या कार्य कर्तृत्वामध्ये माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे लोकप्रतिनिधी या नात्यांने २७ वर्षे योगदान राहिलेले आहे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवाअध्यक्ष विवेक कोल्हे या तिस-या पिढीने आजोबानंतर विधीमंडळाचा वारसा सुरू केला याचा संवत्सरकरवासियांना अभिमान असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी केले. आमदार विवेक कोल्हे यांची विधान परिषदेची कारकीर्द स्मरणात राहणारी ठरणार आहे असेही ते म्हणाले.



           विधान परिषदेवर भाजपाच्यावतीने युवानेते विवेक कोल्हे यांची बिनविरोध निवड झाल्याबददल संवत्सर गांवच्या वतींने संजीवनी कारखाना कार्यस्थळावर त्यांचा सत्कार करतांना ते बोलत होते. प्रारंभी कारखान्याचे संचालक बापूसाहेब बारहाते यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भाजपाचे ज्येष्ठ प्रांतीक सदस्य पांडुरंगशास्त्री शिंदे प्रास्तविक करतांना म्हणाले की, केंद्रीय व राज्यस्तरीय भाजपा नेतृत्वाने अहिल्यानगर जिल्हयाची दखल घेत दोन आमदार दिले त्यात युवानेते विवेक कोल्हे व सुनिल कर्जतकर यांचा समावेश आहे. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना तालुक्याची कामधेनू सांभाळत शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर केल्या. माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी २०१४ ते २०१९ या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व युती शासनाच्या बहुसंख्य मंत्रीमंडळामार्फत कोपरगांव मतदार संघात विकासाच्या अनेक योजना राबविल्या आता युवानेते विवेक कोल्हे हे मतदारसंघाच्या विकासाचे मनोरथ पूर्ण करतील.


       . ज्ञानेश्वर परजणे पुढे म्हणाले की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाची विचारधारा थेट तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे मोठे काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत युवानेते विवेक कोल्हे यांना संधी देत अहिल्यानगर जिल्हावासियांना न्याय दिला आहे. . विवेक कोल्हे हे उच्चशिक्षीत असुन त्यांचा सहकार, शिक्षण, कृषी, सामाजिक, सांस्कृतिक, पाणी, बँकींग, साखर कारखानदारी, औद्योगिक, ग्रामीण पायाभूत सुविधा आदि क्षेत्रात चांगला अभ्यास आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातुन त्यांनी मोठे युवा संघटन उभे केले आहे. त्यांच्या निवडींने प्रलंबित विकास कामांना चालना मिळेल.



           याप्रसंगी महंत दामोदरदा महानुभाव, माजी संचालक फकिरराव बोरनारे, संभाजीराव बोरनारे, बापूराव परजणे, किशोर परजणे, चिमा दैने, अशोकराव लोहकणे, गणेश साबळे, विशाल परजणे, प्रविण भोसले, शिवाजी शेटे, शांताराम शिंदे, गोविंद परजणे, अनिल परजणे, अभिजित आबक, प्रदिप लोखंडे, अनिल शेटे, विरेश गायकवाड, सागर भोसले, देविदास पगारे, राजेंद्र वाकचौरे, रामदास खेडकर, साहेबराव सोनवणे, गोकुळ पवार, शिवाजीराव आसुदे, सचिन शेटे, किरण निरगुडे, यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी वृंद मोठया संख्येने उपस्थित होते. फटाक्यांच्या आतषबाजी मध्ये त्यांचा जयघोष करत कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे यांचे स्वागत केले. माजी संचालक फकिरराव बोरनारे यांनी आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!