आत्मा मालिक एनडीए अकॅडमीच्या निखील देवरेची लेफ्टनंटपदी निवड
आत्मा मालिक एनडीएच्या शिरपेचात मानाचा तुरा
कोपरगाव समाचार :- कोकमठाण येथील
आत्मा मालिक एनडीए अकॅडमीने यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली.या अकॅडमीचा शूर कॅडेट निखिल किरण देवरे यांने SSC Tech Entry परीक्षेत दणदणीत यश मिळवीत भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदासाठी आपली जागा निश्चित केली.
आता कॅडेट निखिल गया येथे आॅफीसर्स ट्रेनींग अॅकाडमीत ४९ आठवड्यांच्या प्रशिक्षणासाठी जाणार आहे. या प्रशिक्षणानंतरतो सैन्यदलात लेफ्टनंट पदावर रूजू होईल.
याबाबत माहीती देताना विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकूमार सूर्यवंशी म्हणाले, आत्मा मालिक एनडीए अॅकाडमीत अनुभवी प्रशिक्षक आहेत. आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. सैन्यदलातील विवीध पदांच्या परिक्षेत येथील विद्यार्थी सातत्याने यश संपादन करीत असतात. निखील देवरे यांच्या लेफ्टनंट पदाच्या निवडीमुळे आत्मा मालिक एनडीएच्या अॅकाडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे , वसतीगृह व्यवस्थापिका माई पटेल माई आदिंनी निखील चे अभिनंदन केले
.
आत्मा मालिक एनडीए अॅकाडमीत मला शिस्त, ध्येय निश्चीती आणि कठोर परिश्रम करण्याचे धडे मिळाले. हि देशपातळीवरील एक उत्तम अॅकाडमी आहे. माझ्या यशात या अॅकाडमीचे महत्वाचे योगदान आहे.
कॅडेट निखिल किरण देवरे(लेफ्टनंट )




