banner ads

भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकांची निर्दोष सुटका

kopargaonsamachar
0

 

भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकांची निर्दोष सुटका

कोपरगाव समाचार :-- सन 2013 च्या दरम्यान महाराष्ट्रातील मालेगाव येथे बॉम्बस्फोट घडविण्यात आले होते त्या बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञा सिंह व इतर अनेकांची नावे विनाकारण गोवण्यात आली होती त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी संसदेत निवेदन करताना भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक हे भगवा दहशतवाद पसरवितात असे वादग्रस्त विधान केले होते त्यांच्या या विधानाचा संपूर्ण महाराष्ट्रात निषेध करण्यात आला होता व अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते त्यापैकीच एक कोपरगाव शहरातील भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक , विनायक गायकवाड, चेतन खुबाणी, सुभाष दवंगे, सैदू बाबा शेख,राजेंद्र खिलारी,राजेंद्र खैरे,बाळासाहेब वाघ, रविकरण ढोबळे, अक्षय क्षत्रीय, व कै. प्राध्यापक सुभाष शिंदे सर यांचे वर सरकारने आंदोलन केले म्हणून गुन्हा दाखल केलेला होता सदरील घटना 2013 रोजी झालेली व सरकार तर्फे 2016 रोजी गुन्हा दाखल करण्यात आली



अशावेळी माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सर्व पुरावे तपासून वरील सर्व सन्माननीय कार्यकर्त्यांची पुराव्या अभावी निर्दोष सुटका करण्यात आली कार्यकर्त्यांच्या वतीने अँड मच्छिंद्र खिलारी व , अँड .संजय मंडलिक यांनी बाजू मांडली.

कोपरगाव शहारत या निकालातमुळे सत्याचा विजय उशिरा होतो पण होतोच अशा प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!