banner ads

संजीवनीत एआय नवकल्पनांचा जल्लोष

kopargaonsamachar
0

 

संजीवनीत एआय नवकल्पनांचा जल्लोष 


एआय नेक्सस हेकॅथॉन स्पेर्धेत ३०० विद्यार्थ्यांचा सहभाग
कोपरगाव समाचार :संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्लबच्या वतीने संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज व संजीवनी युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांसाठी ‘संजीवनी एआय नेक्सस हेकॅथॉन’ या प्रकल्प व सादरीकरण  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


 विद्यार्थ्यांमधील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील नवोन्मेशक कल्पनांना चालना देऊन भविष्यात समाज व आधुनिक उद्योगांसाठी एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व्हावा, या उद्धेशाने  ही स्पर्धा पार पडली. आरोग्य,  शिक्षण, वाहतूक, उद्योग उत्पादन यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये एआयमुळे कामकाज अधिक वेगवान, अचूक आणि कार्यक्षम होत असून निर्णय प्रक्रियाही अधिक परिणामकारक बनत आहे. त्यामुळे येणाऱ्या  काळात एआय हे विकासाचे प्रमुख साधन ठरणार असल्याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. या स्पर्धेत ७१ गटांमधील सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत एआय संदर्भातील नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले.



   प्रारंभी संजीवनी ग्रुप ऑफ स्कूॅल्सच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी या  प्रकल्प व सादरीकरण स्पर्धेचे उद्घाटन केले आणि त्यांनी प्रत्येक गटाने सादर केलेल्या प्रकल्पाची बारकाईने माहिती घेतली. ‘स्मार्ट एआय कॅम्पस अँड  सस्टेनेबल सोसायटी’ या संकल्पनेअंतर्गत एआय फॉर सस्टेनेबल इन्फास्ट्रक्चर, स्मार्ट इंडस्ट्री ४.० अँड  मॅन्युफॅक्चरींग, स्मार्ट एनर्जी अँड ग्रीन एनर्जी, एआय फॉर  अॅग्रिकल्चर अँड  रूरल इनोव्हेशन, स्मार्ट कॅम्पस अँड  एज्युकेशन एआय व ओपन इनोव्हेशन -एआय फॉर वर्ल्ड प्रॉब्लेम्स असे विषय स्पर्धेसाठी ठेवण्यात आले होते.
यात तुतिय वर्ष , इलेक्ट्रॉनिक्स अँड  कॉम्प्युटर इंजिनिअरींग बी. टेकच्या चंचल चव्हाण, सारीका मोरे व तनुजा घाटे यांच्या ग्रुपने प्रथम, द्वीतिय वर्ष  इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी बी. टेकच्या प्रथमेश  भंडारी, विश्वजीत  पावडे, नम्रता वेताळ व गायत्री पानसरे यांच्या गटाने द्वीतिय आणि वैभव साळवे, प्रथमेश  शेजवळ, चैतन्य पवार व साईक्रिष्ण शेलार या तुतिय वर्ष   कॉम्प्युटर बी. टेकच्या विद्यार्थ्यांनी तृतिय क्रमांकाचे बक्षिस मिळविले. प्रथम, द्वीतिय व तृतिय क्रमांकाच्या मानकऱ्यांना  अनुक्रमे रू ७ हजार, रू ५ हजार व रू ३ हजार रूपयांची बक्षिसे होती. याशिवाय  त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रके देवुनही गौरविण्यात आले.

   आज जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झपाट्याने  वाढत असून सर्वच क्षेत्रांमध्ये अचूकता, कार्यक्षमता आणि नावीन्य निर्माण करण्यासाठी त्याची महत्त्वपूर्ण भूमिका दिसून येत आहे. त्यामुळे नवीन पिढीतील युवक-युवतींनी या तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान आत्मसात करणे ही केवळ गरज नसून काळाची अनिवार्यता बनली आहे. याच पार्श्वभूमीवर, केवळ आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांपुरते मर्यादित न राहता देशभरातील विद्यार्थ्यांना एआयच्या विविध पैलूंशी परिचित करून देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेला योग्य दिशा मिळून ते देशाच्या तांत्रिक प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. या उद्देशाने, पुढील वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर एआय आधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे, जेणेकरून देशभरातील विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये सिद्ध करण्याची संधी मिळेल, तसेच नवोन्मेषी विचारांना चालना मिळेल. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता, संशोधनाची आवड आणि तांत्रिक आत्मविश्वास वाढीस लागेल, असा विश्वास संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी बक्षीस वितरण सोहळ्यात  व्यक्त केला.
 

    अमित कोल्हे व डॉ. मनाली कोल्हे यांचे हस्ते बक्षिस वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी डायरेक्टर डॉ. आर. ए. कापगते व विविध विभागांचे विभाग प्रमुख आणि डीन्स उपस्थित होते. विभाग प्रमुख डॉ. माधुरी जावळे व क्लबचे समन्वयक डॉ. अनिलकुमार ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली क्लबचे विद्यार्थी प्रतिनिधी हिमांशु  बाविसकर व श्रुती गवळी यांनी  स्पर्धेचे योग्य नियोजन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!