banner ads

संजीवनी फार्मसी महाविद्यालयाच्या बोहरा व मुजमुले यांची राष्ट्रीय जीपॅट व गेट परीक्षेत उत्तुंग भरारी

kopargaonsamachar
0

 

संजीवनी फार्मसी महाविद्यालयाच्या बोहरा व मुजमुले यांची राष्ट्रीय  जीपॅट व गेट परीक्षेत उत्तुंग भरारी


  प्रथमचा जीपॅट मध्ये ३१ वा तर विशालचा  गेटमध्ये ४४० वा  राष्ट्रीय  रॅन्क
कोपरगांव समाचार :-संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाच्या प्रथम बोहरा याने देशातील  नामांकित फार्मसी महाविद्यालयातील एम. फार्मसी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या  जीपॅट या राष्ट्रीय  स्पर्धेत देशात ३१ वा तर विशाल  मुजमुले याने याच परीक्षेत देशात १५५४ वा रॅन्क मिळविला. तर देशातील  आयआयटी व एनआयटी मध्ये एम.टेक. (बायोटेक्नॉलॉजी) प्रवेशासाठी देश  पातळीवर घेण्यात आलेल्या गेट परीक्षेत विशालने देशात ४४० वा रॅन्क मिळविला तर प्रथमने १२३३ वा रॅन्क मिळवुन दोघांनीही आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन न घडवत संजीवनी फार्मसीच्या गुणवत्तेच्या मुकूटात सन्मानाचा मोरपीस खोवला.  तसेच या व्यक्तिरीक्त या महाविद्यालयाचे जीपॅट मध्ये ११ व गेट मध्ये २ इतर विद्यार्थ्यांनी पात्रता प्राप्त केली आहे.



   जीपॅट (ग्रज्युएट फार्मसी  अॅप्टिट्यूड टेस्ट) ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर एनबीईएमएस (नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनॅशन्स इन मेडीकल सायन्सेस) मार्फत घेण्यात येते. या परीक्षेला देषातुन बी. फार्मसीच्या अंतिम वर्षातील ५५४९२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातुन संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे, ही बाब कौतुकास्पद आहे.  तेसच गेट परीक्षेत प्रथम बोहरा याने लाईफ सायन्स विषयात देश  पातळीवर ४०,०३५ विद्यार्थ्यांमधुन १२३३ वा रॅन्क मिळविला व बायोटेक्नॉलॉजी या विषयात २१५१३ विद्यार्थ्यांमधुन ३१४० वा रॅन्क मिळविला. विशाल  मुजमुले यानेही जीपॅट मध्ये ५५४९२ विद्यार्थ्यांमधुन देश पातळीवर १५५४ वा रॅन्क मिळविला.



   संजीवनीचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे यांनी दोनही विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे व डायरेक्टर डॉ. विपुल पटेल यांचे अभिनंदन केले. तर संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत सत्कार केला. यावेळी पालक सचिन सुभाषचंद्र बोहरा, राखी सचीन बोहरा, बबन नानासाहेब मुजमुले तसेच हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नंस डॉ. आर. एस. शेंडगे  व इतर संबंधित प्राद्यापक उपस्थित होते.
  
संजीवनी फार्मसी  महाविद्यालयास ऑटोनॉमस दर्जा प्राप्त आहे. त्यामुळे आम्हाला औषधनिर्माण शास्त्रातील अद्ययावत ज्ञान मिळाले. आम्हा दोघांनाही आता एम.फार्मसीचा दोन वर्षांचा  कोर्स पुर्ण करण्यासाठी एआयसीटीई कडून दरमहा १२ हजार ४०० रूपये स्टायपेंड मिळणार आहे.

-प्रथम बोहरा, विद्यार्थी

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!