banner ads

काळेंनी पाणी घालवले याउलट येसगावने शहराला पाणी पुरवले : योगेश बागुल

kopargaonsamachar
0

 

काळेंनी पाणी घालवले याउलट येसगावने शहराला पाणी पुरवले : योगेश बागुल


कोपरगाव समाचार:-पाच नंबर तलाव योजना अद्यापही अपूर्ण आहे हे सर्वश्रुत आहे.अनेक नागरिक सामाजिक कार्यकर्ते त्यावर प्रकाश टाकता आहे मात्र गैरवापर करून अपूर्ण योजनेचे पूर्ण बिल काढून विरोधकांनी कोपरगावकरांना फसवले आहे ? मागील चार वर्षात स्वतःवर फुले उधळून घेणाऱ्या आ.काळे यांनी फक्त खोटा गवगवा करण्याचे काम केले आहे व शहराला वेठीस धरले आहे.



माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब यांनी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तळ्यांच्या जागा घेऊन ठेवल्या म्हणून कोपरगाव शहराला आज आपण पाणी देऊ शकतो आहोत. ज्या पाच नंबर तळ्याचे श्रेय विरोधक घेण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी ती जागाच शंकरराव कोल्हे यांनी घेऊन ठेवली होती याची जाणीव ठेवावी. येसगावणे पाणी देण्याचेच काम केले आहे तुमच्यासारखे तालुक्याचे पाणी घालवण्याचे काम केले नाही असा सणसणीत टोला मा.उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी लगावला आहे.


अर्धवट आरोप करणाऱ्यांनी एकदा आपल्या नेत्यांनी समन्यायीचे आणि आरक्षित पाणी घालावण्याचे पाप करून शहरासह तालुक्याचे नुकसान करण्याचं काम केलं आहे त्याचे आत्मपरीक्षण करावे. येसगावने कोपरगाव शहराला कायमच सहकार्याची आणि मदतीची भावना ठेवली आहे दुर्दैवाने काहींचे योगदान शून्य आणि आयत्या पिठावर फक्त रेघोट्या मारण्याचे पाप करणारे इतरांच्या योगदानाची मोजमाप करून वरनाकाने बोलतात हे हास्यास्पद आहे असेही योगेश बागुल म्हणाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!