संजीवनी च्या आठ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड
कोपरगांव समाचार :- संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या आठ विद्यार्थ्यांची विवीध कंपन्यात आकर्षक वेतनावर नोकरीसाठी निवड झाली. विध्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज मध्ये विविध नामांकीत कंपन्यांचे अधिकारी येऊन विध्यार्थ्यांच्या मुलाखती घेत असतात. विद्यार्थ्यांची दर्जेदार तयारी, कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि उद्योगाभिमुख दृष्टिकोन यामुळे ते निवडीसाठी पात्र ठरत असून, अंतिम निकालाच्या अगोदरच नोकरी मिळण्याचे त्यांचे स्वप्न साकार होत आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांत समाधानाचे तसेच आनंदाने वातावरण निर्माण होते आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या नियोजबध्द कामगीरीमुळे हि किमया घडते आहे.
या निवड झालेल्या विद्यार्थ्यांत फाॅरेसिया इंडिया लिमिटेड कंपनीने मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या एकता मनोज आहेर हिची नोकरीसाठी निवड केली. आरकेएस इंजिनिअरींग सर्विसेस कंपनीने सिव्हिल इंजिनिअरींगच्या गायत्री योगेश चौधरी , श्रध्दा माणिक दिघे, दाक्षयाणी विक्रम थोरात व चैताली बाळासाहेब थोरात यांची निवड केली. मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या मयुर चंद्रकांत डागे याची हाय टेक रडिएटर्स, मेकॅट्राॅनिक्स इंजिनिअरींगच्या प्रदिप अनिल जाधव याची रोबोवेल्ट सिस्टीम प्रा. लि. कंपनीने तर सिव्हील इंजिनिअरींगच्या जय महेश भोसले याची डिझाईन स्टुडिओने निवड केली.
संस्थेचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.
मी राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा मुलगा आहे. संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज या ऑटोनॉमस संस्थेत मेकॅट्राॅनिक्स इंजिनिअरींगला प्रवेश मिळाला व तेथेच माझी करिअरच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. माझा अंतिम वर्षाचा प्रोजेक्ट ‘फ्लोअर क्लिनिंग रोबोट युझिंग सोलर एनर्जी’ हा होता. या प्रोजेक्टचा उपयोग मला रोबोवेल्ट सिस्टीम या कंपनीत रोबोटीक्स इंजिनिअर निवडीसाठी झाला. संजीवनीमुळे माझे व माझ्या आई वडीलांचे स्वप्न पूर्ण झाले, याचा मला मनस्वी आनेद आहे. सध्या आटोमेशनचा जमाना आहे. भविष्यात येथे मिळालेल्या नोकरीमुळे माझे भविष्य उज्वल आहे.
- प्रदिप जाधव, विद्यार्थी




