banner ads

स्वामी समर्थ सभामंडप भूमिपूजनात गोंधळ काळे गटाचा विरोध, नागरिकांत संताप

kopargaonsamachar
0

 स्वामी समर्थ सभामंडप भूमिपूजनात गोंधळ काळे गटाचा विरोध, नागरिकांत संताप


कोपरगाव समाचार:-श्री स्वामी समर्थ मंदिर, सुभद्रानगर येथे सभामंडप व परिसर सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजन समारंभाचा उत्साहपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास विवेक कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती लाभली, नगराध्यक्ष पराग संधान व नगरसेवकांच्या हस्ते विधीपूर्वक पूजन करून भूमिपूजन करण्यात आले.यावेळी काळे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी या कार्यक्रमस्थळी गोंधळ निर्माण करून कामाला विरोध दर्शविला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये काळे गटाच्या विरोधात रोष व्यक्त होत आहे.



कोपरगाव नगरपरिषदेत सत्तांतर झाल्यानंतर गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध विकासकामांना गती मिळू लागली आहे. बदललेल्या नेतृत्वामुळे कामकाजात वेग आणि परिणामकारकता दिसून येत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.अशा धार्मिक स्थळी वाद विरोध करू नका काय असेल ते राजकीय जोडे मंदिर परिसराच्या बाहेर ठेवा असे आवाहन युवानेते विवेक कोल्हे यांनी केल्यानंतर देखील काळे गटाने स्थानिक नागरिकांना विरोध केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
विशेषतः नवीन पालिका पदाधिकाऱ्यांनी धार्मिक व सांस्कृतिक स्थळांच्या विकासावर भर दिला जात असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या या सभामंडप बांधकामामुळे मंदिर परिसरात भाविकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. 

यामुळे धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन आणि सामाजिक उपक्रमांसाठी सुसज्ज जागा निर्माण होणार असून परिसराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे मात्र काळे गटाला यात राजकारण करण्यात जास्त रस होता असेच यावरून स्पष्ट झाले कारण याच कामाचे श्रेय घेण्यासाठी आधी फलकबाजी केली आणि नंतर स्वतःच विरोध केला यावरून दुतोंडी भूमिका काळे यांची आहे असा जोरदार हल्लाबोल कोल्हे गटाकडून करण्यात आला आहे.महाराष्ट्र पूर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत सुमारे ३७ लाख ७२ हजार रुपयांच्या निधीतून सांस्कृतिक भवन उभारणीचे हे काम हाती घेण्यात आले आहे. या उपक्रमामुळे सुभद्रानगर परिसराच्या विकासाला नवे बळ मिळणार असून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.हा निधी कुणाचेही श्रेय नसून खऱ्या अर्थाने नागरिकांचा अधिकार असणारा निधी आहे त्यामुळे याचे श्रेय विरोधकांनी घेऊ नये असे नगराध्यक्ष पराग संधान यांनी मत व्यक्त केले आहे.



उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, बांधकाम सभापती निलोफर पठाण, राजेंद्र सोनवणे, रवींद्र पाठक, रवींद्र नरोडे,प्रसाद आढाव,विजय वाजे, वैभव गिरमे, योगेश बागुल, हरिभाऊ गिरमे, राजेंद्र सालकर, कलविंदर दडियाल,स्वप्निल मंजुळ, संतोष शिंदे, आकाश वाजे, नाना भुजबळ, संजय सातपुते,अतुल काले,अनिल आव्हाड,रवींद्र कथले, संतोष शेजवळ, गुरमित दडियाल, मयूर गायकवाड, सोमनाथ मस्के,नाना भुजबळ, विजया देवकर, पल्लवी दडियाल,संजय सातपुते, राजेंद्र गायकवाड, राजेंद्र जाधव,अमोल अजमेरे, संजय उदावंत, दत्तू पगारे, विक्रमामदित्य सातभाई,उमेश गोसावी,महेंद्र नाईकवाडे,निसार शेख,सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे, रोशन शेजवळ,कुंदन भारंबे, धनंजय आढाव,भाऊसाहेब आढाव यासह पदाधिकारी नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!