banner ads

निष्ठा आणि कामगिरीला सलाम; विवेक कोल्हेंची उमेदवारी जाहीर मतदार संघात जल्लोष

kopargaonsamachar
0

 

निष्ठा आणि कामगिरीला सलाम; विवेक कोल्हेंची उमेदवारी जाहीर मतदार संघात जल्लोष


कोपरगाव समाचार:- युवानेते विवेक कोल्हे यांना राज्याच्या विधान परिषदेसाठी भाजपाकडून उमेदवारी जाहीर असून या ऐतिहासिक निवडीबद्दल कोपरगाव मतदारसंघात विविध ठिकाणी मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी युवा नेते विवेक कोल्हे तसेच कोल्हे कुटुंबाच्या निष्ठेची दखल घेतली असून विवेक कोल्हे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्याने योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

विवेक कोल्हेंसारख्या युवा व अभ्यासू नेतृत्वाला विधान परिषदेवर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त होत असून या नव्या समीकरणामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,व कोअर कमिटी यांनी कोल्हे कुटुंबावर मोठा विश्वास दाखवत विधानपरिषदेची उमेदवारी युवा नेते विवेक कोल्हे यांना दिली आहे. दोन वर्षांपूर्वी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींनी विवेक कोल्हे यांना दिल्लीला बोलावून महायुतीसाठी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत त्यांच्या पुढील राजकीय भवितव्यासाठी ठाम पाठीशी उभे राहण्याचे संकेत दिले होते.


यावेळी भाजपाच्या मा.आ. स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते विवेक कोल्हे यांनी देशाचे सहकार मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपाच्या पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेचा आदर करून 2024 ची विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक न लढवूनही त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या उन्नतीसाठी सातत्याने पुढाकार घेत पक्षासाठी उल्लेखनीय कामगिरी केली.



 तीन महिन्यांपूर्वी पार पडलेल्या कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत दैदीप्यमान यश संपादन करत त्यांनी आपल्या नेतृत्वाची छाप संपूर्ण महाराष्ट्रात उमटवली आहे. तसेच भारतीय जनता पार्टीच्या उन्नतीसाठी मेहनत घेतली.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी कोपरगाव येथे पार पडलेल्या देशातील पहिल्या सीबीजी प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी देशाचे सहकार मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला होता. त्यावेळी प्रमुख नेत्यांनी विवेक कोल्हे यांना पक्षाकडून योग्य वेळी संधी दिली जाईल,असे संकेत दिले होते.त्यानुसार भाजपाने दिलेला शब्द पूर्ण करत नुकतीच युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांची विधान परिषदेच्या सदस्यपदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे.विवेक कोल्हे यांना विधानपरिषदेवर नियुक्त केल्यामुळे कोपरगाव मतदार संघामध्ये आनंदाची लाट पसरलेली आहे.या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोपरगाव तालुक्यात तसेच मतदारसंघातील विविध भागांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटून जल्लोष साजरा केला.अनेक ठिकाणी फ्लेक्स झळकले दिवाळीप्रमाणे आनंदोत्सव साजरा होत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!