banner ads

सेवा हाच धर्म’चा प्रत्यय; जयंतीदिनी रुग्णवाहिकेचे लोकार्पण

kopargaonsamachar
0

 

सेवा हाच धर्म’चा प्रत्यय; जयंतीदिनी रुग्णवाहिकेचे लोकार्पण


कोपरगाव समाचार :--सहकार महर्षी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची जयंती संपूर्ण कोपरगाव मतदारसंघात सर्वत्र ‘प्रेरणा दिन’ म्हणून साजरी करण्यात आली. सेवा हाच धर्म या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन कोपरगाव नगरपरिषद संचलित व आयडीबीआय बँक शाखा कोपरगाव यांच्या सौजन्याने वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलत गरजवंत रुग्णांच्या सेवेसाठी नूतन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली असून सहकार महर्षी स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांच्या जयंतीदिनी या रुग्णवाहिकेचे लोकार्पण मा.आ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.






युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत जाहीर केलेल्या विकासाच्या विश्वासनाम्यानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. आयडीबीआय बँक, कोपरगाव शाखेच्या सौजन्याने ही सुसज्ज रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यात आली असून तिचा लोकार्पण सोहळा उत्साही वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी मा.आ.स्नेहलता कोल्हे तसेच नगराध्यक्ष पराग संधान यांच्या उपस्थितीत माजी मंत्री स्व. शकराराव कोल्हे साहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ करण्यात आला असून ही रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी दाखल झाली आहे.कोपरगाव नगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी दिनांक 24 मार्चपासून ही रुग्णवाहिका कोपरगाव नगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली शहरातील नागरिकांच्या अत्यावश्यक व तातडीच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध राहणार आहे.शहरात कुठे काही अनुचित घटना घडल्यास अथवा अडी-अडचणीच्या काळात नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाच्या वैद्यकीय विभागाशी संपर्क साधून जास्तीत जास्त नागरिकांनी तातडीने मदत मिळवण्याचे आवाहन कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने केले आहे.याप्रसंगी कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर सर्व समिती सभापती,आजी माजी नगरसेवक,पदाधिकारी,कार्यकर्ते,आयडीबीआय बँकेचे मॅनेजर गौतम मंधाटा व कर्मचारी उपस्थित होते तसेच मुख्याधिकारी सुहास जगताप व कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!