राज्यातील १९० बाजार समित्यांमध्ये 'शेतकरी भवन'
वाढवण बंदर परिसरात जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारणार !
कोपरगाव समाचार :- शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून तो देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्याला सक्षम केल्यावरच राज्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल. याच दृष्टिकोनातून राज्यातील ३०६ पैकी जवळपास १९० कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी सर्व सोयीसुविधांनी युक्त असे 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन' उभारण्यात येत आहे. तसेच, शेतमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी वाढवण बंदर परिसरात तब्बल १२०० एकर जागेवर पॅरिसच्या धर्तीवर जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प शासनाने केला असल्याची माहिती पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आज येथे दिली.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाचे भूमिपूजन व विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, कोपरगावचे नगराध्यक्ष पराग संधान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम आदी उपस्थित होते.
श्री. रावल म्हणाले , राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज देण्याच्या उद्देशाने सौर कृषिपंप योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जात असून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावाने खरेदी करून शासनाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. यासोबतच महिलांच्या सक्षमीकरणासाठी 'लाडकी बहीण' योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. शेतीमालाच्या विक्रीत आधुनिकता आणण्यासाठी 'राष्ट्रीय कृषी बाजार' (ई-नाम) प्रणालीचा वापर वाढविला जात आहे. 'एक देश, एक बाजारपेठ' या संकल्पनेनुसार राज्यात 'एकत्रित परवाना' व्यवस्था लागू केली जात आहे, जेणेकरून राज्यातील कोणत्याही बाजार समितीतून शेतमालाची खरेदी करणे व्यापाऱ्यांना शक्य होईल. आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने २१०० कोटी रुपयांचा 'मॅग्नेट २.०' हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यातून शेतमालावर प्राथमिक प्रक्रिया, मालवाहतूक व साठवणूक प्रकल्पांसाठी विशेष अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे, असेही श्री. रावल यांनी सांगितले.
श्री. रावल पुढे म्हणाले , कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाने विशेष कृती आराखडा तयार केला आहे. या अंतर्गत राज्यात 'कांदा महाबँक' उभारण्यात येणार असून समृद्धी महामार्गावर पाच ठिकाणी 'कांदा बँक' निर्माण केल्या जातील. या माध्यमातून कांद्याची साठवणूक, वर्गीकरण, वेष्टन व मूल्यवर्धन करण्यावर भर दिला जाणार आहे. कांदा उत्पादकांना योग्य भाव मिळावा व त्यांचे नुकसान टळावे, यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीमार्फत तातडीने उपाययोजना केल्या जात आहेत.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने सहकार व विकासाचा मोठा वारसा अत्यंत चांगल्या पद्धतीने जपला आहे. बाजार समितीच्या वाढत्या उलाढालीची दखल घेत भविष्यात येथे शीतगृह, साठवणूक गोदामे व शेतमाल प्रतवारी यंत्रणा उभारण्यासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल. भौगोलिक मानांकन प्राप्त शेतमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी परदेशांसोबत व्यापार करार केले जाणार आहेत. येथील शेतकरी भवनाचे काम लवकरच पूर्ण होईल व भविष्यातील सर्व योजनांमध्ये कोपरगाव बाजार समि inतीला प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.युवा नेते विवेक कोल्हे म्हणाले की, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेबांची शिकवण होती की आपल्याला शेतकरी केंद्रबिंदू ठेवून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. स्व.कोल्हे साहेबांचे शिक्षण होऊन स्वतंत्र पूर्वकाळात ते परदेशात गेले. फोर्ड फाउंडेशनच्या माध्यमातून अमेरिकेला गेले शिक्षण पूर्ण केलं.त्या ठिकाणी शेतकरी कुटुंबासमवेत त्यांच वास्तव्य होतं. त्यानंतर स्वित्झर्लंडला जाऊन त्यांनी घड्याळाचा कारखाना टाकण्याच ठरवलं. त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले की ते तुला शिक्षण घेऊन आपल्या भारत देशातील शेतकऱ्यांसाठी काय करता येईल ते डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या.कर्मवीर अण्णांसोबत रयत शिक्षण संस्थेत काम करून तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा घेऊन जाण्याचे काम केलेले आहे. अशा असंख्य एन एच सी सी सारख्या संस्था असतील ज्यामुळे सहकार तळागाळात गेला या सर्व संस्थांवर आदरणीय साहेबांनी काम केलं. त्या मागचा एकच हेतू होता की आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच त्या ठिकाणी झोपला पाहिजे 80% समाजकारण 20% राजकारण हे मंत्र घेऊन. स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांच्या आदर्श विचारधारेवर आम्ही काम करत आलेलो आहोत. कोपरगाव मार्केट कमिटीत देखील बिपीनदादा कोल्हे मार्गदर्शनाखाली सलग तीन वर्ष बिनविरोध निवडणूक केली. असे ते बोलताना म्हणाले. अमित शाह यांनी केंद्रीय स्तरावर नेमल्या ncel सारख्या धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांनी शेतकरी सन्मान निधीसारख्या अनेक लाभदायक योजना सुरू करून शेतकरी हिताचे धोरण घेतले आहे.यावेळी बिपीनदादा कोल्हे म्हणाले की, कोपरगाव मार्केट कमिटीच्या सलग तीन निवडणुका आम्ही बिनविरोध केल्या. त्याचा उद्देश एकच होता. की ही शेतकऱ्यांची संस्था आहे. आणि म्हणून या ठिकाणी राजकारण आणायचं नाही सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे.आमच्या मार्केट कमिटीने स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली जागा राहता मार्केट कमिटीला दिलेली आहे. स्वर्गीय कोल्हे साहेब स्व. काळे साहेबांच्या दूरदृष्टीतून आम्ही सलग तीन वेळा ही मार्केट कमिटी बिनविरोध केली. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी स्वर्गीय कोल्हे साहेबांनी देशातील पहिला मोर्चा हा रिझर्व बँकेवरती रूमने मोर्चा काढला. तेव्हापासून देशातील संपूर्ण शेतकऱ्यांना कमीत कमी व्याज दराने कर्ज पुरवठा होऊ लागला. हे सर्व कोल्हे साहेबांमुळे झाले. महाराष्ट्र मध्ये फक्त काळे आणि कोल्हे यांचे कारखाने बिनविरोध का होतात तर स्वर्गीय काळे साहेब व कोल्हे साहेब हे जेष्ठ होते व त्यांची एक विचारसरणी होती की शेतकऱ्यांना विचार द्यायचा, विचारधारा द्यायची, शेतकरी हिताच्या दृष्टीने काम करून संस्था टिकवायच्या.आपल्याला संस्थेच्या ठिकाणी राजकारण आणलं नाही पाहिजे. आज या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी सर्वांनी एकत्र रहाणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
मा.आ.स्नेहलता कोल्हे म्हणाले की, बिपीनदादा कोल्हे यांनी कोपरगाव मार्केट कमिटीची निवडणूक बिनविरोध कशी होईल यासाठी सातत्याने प्रयत्न केले. मनाचा मोठेपणा सहकार क्षेत्र असेल शेतकऱ्यांच्या संबंधित विषय असतील पाण्याचे प्रश्न असतील राजकारण किती करावा आणि कुठे थांबव हे समजलं पाहिजे खरंतर म्हणून थोडं वाईटही वाटलं असून या कार्यक्रमास आमदार उपस्थित पाहिजे होते. ही बाजार समिती एकत्र येऊन बिनविरोध केली ते सर्व उपस्थित पाहिजे होती. सगळ्या जणांमध्ये मनाचा मोठेपणा नसतो असा टोला लगावला. संजीवनीच्या सीबीजी प्रकल्प उद्घाटनाच्या दरम्यान केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कोल्हे गटाच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले की माझा पक्षाचा आमदार तुमच्या सहकार्याने निवडून आला. हा खरा मनाचा मोठेपणा आहे. म्हणून आम्ही स्वर्गीय अजितदादांचे भाषण कधीही विसरू शकत नाही. प्रत्येक कार्यकर्ता शेतकरी आमचा जिवाभावाचा आहे.अगदी स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या कार्यकाळापासून जोडलेला माणूस आमच्याशी जोडला गेलेला आहे. खूप जिवाभावाचा गोतावळा आहे. म्हणून आपले सर्वांचे एक वेगळे ऋणानुबंध आहे. म्हणून आम्ही कधीही कोण कोणत्या पक्षाचा बघत नाही. मी आमदार असताना कधीही असा प्रश्न कोणाला विचारलं नाही. लोकसेवा करण्याची संधी मिळाली असून आम्ही फक्त जनसेवा करण्याचा ध्यास ठेवला. यातून सामान्य माणसाचा प्रश्न सोडवता आला पाहिजे. यासाठी समोरील ते काम करायचं हाच आमचा मुख्य उद्देश होता. त्यावेळी माननीय मंत्री महोदय रावल साहेबांचं खूप सहकार्य झालं असे त्या बोलताना म्हणाल्या.








