banner ads

तालुकास्तरीय पशु-पक्षी प्रदर्शनात ३६ पशुपालकांचा गौरव

kopargaonsamachar
0

 

तालुकास्तरीय पशु-पक्षी प्रदर्शनात ३६ पशुपालकांचा गौरव

आधुनिक पशुपालनातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवा – आ. आशुतोष काळे

कोपरगाव समाचार :--राज्य शासनाच्या माध्यमातून पशु-पक्ष्यांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी गावागावात सरकारी पशुवैद्यकीय डॉक्टरांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायींच्या प्रजातींची वाढ करून कमी खर्चात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाने सकारात्मक प्रयत्न करावेत असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.





कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे जिल्हा परिषद अहिल्यानगर, पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत समिती कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय पशु-पक्षी प्रदर्शन २०२६ च्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. प्रदर्शनातील उत्कृष्ट पशु-पक्ष्यांच्या ३६ मालकांना आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी बोलताना आमदार काळे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अहिल्यानगर हा एकमेव असा जिल्हा आहे जिथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत समितीच्या वतीने तालुकास्तरावर अशा भव्य प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. या प्रदर्शनांच्या माध्यमातून परिसरातील पशु-पक्षी पालन करणाऱ्यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.


हे प्रदर्शन पाहण्यासाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने शेतकरी येत असून त्यांना यातून आधुनिक पशुपालनाची प्रेरणा मिळत आहे.प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या विविध पशुपालकांशी चर्चा केल्यावर नव नवीन माहिती समोर येते. या प्रदर्शनात उच्च जातीच्या गायी, बैल, म्हशी, घोडे, शेळ्या, मेंढ्या यांच्यासह श्वान, मांजर, विविध जातींच्या कोंबड्या आणि बदके असे वैविध्यपूर्ण पशु-पक्षी पाहायला मिळाले. विशेष म्हणजे अनेक तरुणांनी या प्रदर्शनाकडे आता केवळ छंद म्हणून न पाहता एक यशस्वी व्यवसाय म्हणून पाहायला सुरुवात केली असून या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवत आहे ही कौतुकास्पद बाब असल्याचे यावेळी आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.

याप्रसंगी राजेशआबा परजणे, सूर्यभान कोळपे, प्रशांत घुले, श्रीराम राजेभोसले, ज्ञानेश्वर हळनोर, सुखदेव कोळपे, किरण कोळपे, सरपंच चंद्रकला कोळपे, उपसरपंच सुनिता कोळपे, वारी गावचे सरपंच बद्रीनाथ जाधव, उपसरपंच विजय गायकवाड, जिल्हा उप आयुक्त पशु संवर्धन अधिकारी डॉ. उमेश पाटील, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. दशरथ दिघे, गट विकास अधिकारी संदीप दळवी, पशु संवर्धन अधिकारी डॉ. दिलीप जामदार, डॉ. दिलीप दहे, डॉ. श्रद्धा काटे, डॉ. श्रीकांत घोरपडे, पशुपालक आणि नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!