banner ads

हिंदुस्तान फीड्स कंपनीकडून विद्यार्थ्यांना टिफिन व टिफिन बॅगचे वाटप

kopargaonsamachar
0

 

हिंदुस्तान फीड्स कंपनीकडून विद्यार्थ्यांना टिफिन व टिफिन बॅगचे वाटप


कोपरगाव समाचार :--कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथील तिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना श्री साई कॅटल फिड्स सप्लायर्स रांजणगाव देशमुख यांच्या माध्यामातुन हिंदुस्तान फिड श्रीरामपुर यांच्या वतिने सीएसआर फंडातुन जेवणाचे डबे व बॅगचे वाटप करण्यात आले.
अंजनापुर येथिल गावठाण शाळा,गव्हाणे वस्ती शाळा व म्हसोबा वस्ती शाळा या तिन शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शंभर जेवणाचे डबे व बॅगचे वाटप करण्यात आले.यावेळी हिंदुस्थान फिडचे वरिष्ठ विक्री अधिकारी अविनाश शिंदे यांनी कंपनी नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवत असते भविष्यातही असेच उपक्रम राबविलले जाणार असल्याचे सांगीतले.






श्री साई कॅटल फिड्सचे नकुल गव्हाणे म्हणाले कि, हिंदुस्तान फीडने आपली सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविला आहे.यापुर्वीही शाळांना वह्यांचे वाटप करण्यात आले.समाजाच्या विकासाठी संस्था पुढे येत आहे ही बाब कौतुकास्पद आहे.
टिफिन व टिफिन बॅग मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत असल्याचे चित्र शाळेत पाहायला मिळाले.
यावेळी ज्ञानेश्वर गव्हाणे,प्रदिप गव्हाणे,बापूसाहेब गव्हाणे, संतोष गव्हाणे, दत्तू गव्हाणे, महेश गव्हाणे,शांताराम गव्हाणे,आण्णासाहेब गव्हाणे,सतिष गव्हाणे,रामराव गव्हाणे,रामनाथ गव्हाणे,बाबासाहेब गव्हाणे,तुषार गव्हाणे,दैलत गव्हाणे,मोनाली गव्हाणे,अलका गव्हाणे,मंदा गव्हाणे,तुकाराम गव्हाणे,विलास गव्हाणे यांचेसह



मुख्याध्यापिका सुरेखा जाधव ,भारती राऊत,वाल्मीक वाकचौरे,शिक्षक नितीन फटांगरे मथुरा गुंजाळ,सिमा अंबितकर तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!