banner ads

व्यापारी महासंघाची कमान पुन्हा कोयटे यांच्या हाती;

kopargaonsamachar
0

 व्यापारी महासंघाची कमान पुन्हा कोयटे यांच्या हाती;


बाजारपेठ विकासाला नवी गती

कोपरगाव समाचार :--: कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील छोटे-मोठ्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने कार्यरत असून व्यापार वृद्धी आणि बाजारपेठेच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे. शहराची बाजारपेठ अधिक सक्षम करण्यासाठी महासंघाकडून सातत्याने ठोस पावले उचलली जात आहेत.नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची फेर निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे अध्यक्ष पदी तर कार्याध्यक्ष पदी अजित लोहाडे व सुधीर डागा यांची फेर निवड करण्यात आली आहे.







काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन व कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या माध्यमातून किराणा दुकानदारांपासून ते शहरातील छोटे-मोठ्या व्यापाऱ्यांसाठी विविध योजना, सवलती व मार्गदर्शन करून त्यांना सक्षम बनविण्याचे काम काम करण्यात आले आहे. तसेच बाजारपेठ फुलविण्यासाठी ही त्यांचे योगदान अमूल्य आहे. व्यापारी महासंघाच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्याची बाजारपेठ फुलविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत.

याच बैठकीत तालुक्यातील नामांकित उद्योजक संजय भन्साळी व एस.जे.एस. हॉस्पिटलचे सर्वेसर्वा चांगदेव कातकडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच युवा उद्योजक यश विसपुते यांची संचालक म्हणून कार्यकारिणीत नवनियुक्ती करण्यात आली आहे. या नव्या निवडीमुळे महासंघाच्या कामकाजाला अधिक गती आणि बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.दरम्यान, येत्या २४ मे रोजी तालुक्यात उद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘गाव तेथे उद्योजक’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून त्याच दिवशी उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र मानगावे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती महासचिव प्रदीप साखरे यांनी दिली.सदर कार्यकारिणीत अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, कार्याध्यक्ष अजित लोहाडे व सुधीर डागा, महासचिव प्रदीप साखरे, उपाध्यक्ष राजकुमार बंब, नारायण अग्रवाल, संजय भन्साळी, केशवराव भवर, आशुतोष पटवर्धन, चांगदेव कातकडे, खजिनदार तुलसीदास खुबाणी, सचिव गुलशन होडे, सहसचिव महावीर सोनी व किरण शिरोडे यांचा समावेश आहे.तसेच संचालक मंडळात कृष्णा उदावंत, योगेश बागुल, बबलु वाणी, चेतन खुबाणी, सुमित भट्टड, शरद खरात, दिपक गुजराथी, हेमचंद्र भवर, संजय दुशींग, संदीप काबरा, युवराज गांगवे, आनंद लोढा, प्रमोद मुंदडा, अक्षय सोनेकर यांची निवड करण्यात आली आहे.


 कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या युवा आघाडीच्या समन्वयक पदी हर्षल कृष्णानी, मानव शुक्ला, धीरज कराचीवाला, यश विसपुते, अक्षय गिरमे, गोल्डी शिरोडे यांची या बैठकीत निवड करण्यात आली. संबंधित पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहे


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!