banner ads

पीएम आवास योजनेचा कोपरगावला दिलासा; 16 मार्चला लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे” -- पराग संधान

kopargaonsamachar
0

 

पीएम आवास योजनेचा कोपरगावला दिलासा; 16 मार्चला लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे” -- पराग संधान


कोपरगाव समाचार :--कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने येत्या 16 मार्च 2026 रोजी नगरपरिषद हद्दीतील पात्र लाभार्थ्यांना मंजुरी पत्रकांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिली.




अशा प्रकारे प्रधानमंत्री आवास योजनेबाबत अधिक माहिती देताना नगराध्यक्ष पराग संधान म्हणाले की, कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत 48 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहेत. पीएमएवाय-यूच्या 76 व्या आणि पीएमएवाय 2.0 च्या 6 व्या केंद्रीय सनियंत्रण समितींच्या बैठकीत या घरकुलांना नुकतीच मंजुरी देण्यात आली. ही बैठक आवासन व शहरी कार्य मंत्रालय,नवी दिल्ली यांच्या अधिपत्याखाली पार पडली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी असणारी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माध्यमांतून पीएमएवाय 2.0 अंतर्गत शहरातील मजूर असलेल्या 53 लाभार्थ्यांपैकी 11 लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी 1 लाख रुपये प्रमाणे एकूण 11 लाख रुपयांचा निधी 11 मार्च 2026 रोजी वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित



 लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील घर बांधकामासाठी आर्थिक मदत मिळाली आहे.तसेच उर्वरित लाभार्थ्यांना बांधकामाच्या प्रगतीनुसार पुढील टप्प्यातील अनुदान लवकरच देण्यात येणार आहे.तसेच कोपरगाव नगर परिषद मध्ये प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत नाव नोंदणी सुरू आहे. स्वतःच्या मालकीची जागा आहे अशा लाभार्थ्यांना बीएलसी घटकांतर्गत नाव नोंदणी करता येईल व मंजुरीसाठी तो प्रस्ताव लवकरात लवकर शासन स्तरावर पाठवण्यात येतील असेही सांगण्यात आले आहे.त्यामुळे कोपरगाव नगरपरिषद हद्दीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरांच्या बांधकामाला शासनाकडून मोठे सहकार्य मिळणार असून घरकुल उभारणीस अधिक वेग येईल, असा विश्वासही नगराध्यक्ष पराग संधान यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!