banner ads

संजीवनी युनिर्व्हसिटी मध्ये आंतरराष्ट्रीय परीषद संपन्न

kopargaonsamachar
0

 

संजीवनी युनिर्व्हसिटी मध्ये आंतरराष्ट्रीय  परीषद संपन्न


कोपरगांव समाचार :-- तरूणांनी शिक्षण  आणि उद्योग यांची सांगड घालत संशोधनाच्या दृष्टीने  सततचे प्रयोग केले पाहीजे. शिक्षण , दीर्घ आयुष्य , आरोेग्य सेवा, आपत्ती व्यवस्थापन, तंत्रज्ञान अशा  अनेक विषयांवर संशोधन  करणे गरजेचे आहे. सततच्या प्रयोगांनीच संशोधन  होते. संशोधनाला  बळकटी देण्यासाठी संजीवनी युनिर्व्हसिटीने उद्योगांशी  समन्वय साधावा, असे प्रतिपादन हैद्राबाद स्थित सायंट या बहुराष्ट्रीय  कंपनीचे संस्थापक अध्यक्ष व आयआयटी हैद्राबाद अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी.व्ही. आर. मोहन रेड्डी यांनी केले.




        संजीवनी युनिर्व्हसिटी आयोजीत ‘सस्टेनेबल इनोव्हेशन इन इंजिनिअरींग, सायन्स अँड  मॅनेजमेंट’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परीषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. बी.व्ही.आर. मोहन रेड्डी बोलत होते. संजीवनी युनिर्व्हसिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी परीषदेचे अध्यक्षस्थान भुषविले. यावेळी सन्माननिय अतिथी म्हणुन संयुक्त संचालक-संशोधन संघटना, भारतीय विद्यापीठे, नवी दिल्लीचे डॉ. अमरेंद्र पाणी, टोकुशिमा युनिर्व्हसिटी जपानचे प्राद्यापक डॉ. पंकज कोईंकर, युनिर्व्हसिटी ऑफ ऑक्सफर्ड अँड  कोर्स डायरेक्टर, इंग्लंडचे डॉ. अजित जावकर, युनिर्व्हसिटी ऑफ चेस्टर (युके)चे डीन डॉ. अलेक्स फेन्टॉन, सुजीवनी युनिर्व्हसिटीचे व्हाईस चांसलर डॉ. ए.जी.ठाकुर, डीन कविथा राणी, संशोधन  संचालक डॉ. पी. विलिअम व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते ‘अमुर्त स्मरणिकेचे’ प्रकाशन झाले. या परीषदेमध्ये एकुण २५० रिसर्च पेपर्स सादर करण्यात आले होते. विविध ठिकाणचे प्राद्यापक व विद्यार्थ्यांची उपस्थिती उल्लेखनिय होती.




        प्रारंभी डॉ. पी विलिअम यांनी उपस्थितांचे स्वागत करून वक्त्यांची ओळख करून दिली. डॉ. कविथा राणी यांनी परीषदेच्या विषयावर उहापोह केला. डॉ. ठाकुर यांनी संजीवनी शैक्षणिक  संकुलाचा प्रवास सांगताना संस्थापक स्व. शंकरराव  कोल्हे यांची दुरदृष्टिता  व त्या संदर्भात अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व प्रेसिडेंट अमित कोल्हे करत असलेले प्रयत्न विशद  केले.
डॉ. रेड्डी पुढे म्हणाले की हवामान आपत्ती हा एक महत्वाचा संशोधनाचा विषय  आहे.तंत्रज्ञान हेच शाश्वत  विकासासाठी पुरक ठरू शकते. राष्ट्र उभारणीत सहभागी होवुन उद्योजक बणुन नोकऱ्या  देणारे बना, असा सल्ला त्यांनी दिला.
        डॉ. अमरेंद्र पाणी म्हणाले की संशोधनात उत्तमीकरण (जास्तीत जास्त प्रभावीपणा) असणे गरजेचे आहे. संशोधनातुन शाश्वत  विकास साधल्यामुळे गरीबी, आणि भुक दुर होईल. जीवन सुलभ करण्यासाठी ज्ञानाचा वापर करा. एआय तंत्रज्ञानापर्यंत आपण पोहचलो आहोत, संशोधन  समाजाला कसे उपयुक्त ठरेल याचा विचार सर्वांनी केला पाहीजे.
दोन दिवस चाललेल्या या परीषदेच्या समोरप समारंभासाठी एसव्हीकेएम एनएमआयएस ग्लोबल युनिर्व्हसिटीचे सल्लागार डॉ. माधव नारायण वेल्लींग उपस्थित होते. ते म्हणाले की संशोधन  ही काळाची गरज असुन ते नैतिदृष्ट्या कसे करतो, हे महत्वाचे आहे. यावेळी १० नवसंशोधकांचा उत्कृष्ट शोध  निबंधा बध्दल सत्कार करण्यात आला.
        प्रा. डॉ. सुंधाशु  भट यांची सुत्रसंचालन केले तर प्रबंधक प्रा. अमोल ढाकणे यांनी आभार मानले.

  

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!