banner ads

संजीवनीच्या प्रसाद परजणेला जपानमध्ये ३२ लाख रूपयांचे वार्षिक पॅकेज - अमित कोल्हे

kopargaonsamachar
0

 

संजीवनीच्या प्रसाद परजणेला जपानमध्ये ३२ लाख रूपयांचे वार्षिक पॅकेज - अमित कोल्हे



जपानी भाषेच्या प्रशिक्षणाचा थेट लाभ

कोपगाव समाचार : -- संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज मधील उद्योगपूरक शिक्षणाला जपानी भाषेची जोड मिळाली कि काय किमया घडू शकते हे संवत्सर येथील प्रसाद बबनराव परजणे या विद्यार्थ्यांने सिध्द करून दाखवीले.  जपानमधील नामांकित एसएमसी कॉर्पोरेशन  कंपनीने तब्बल  ३२ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज देऊन त्याला नोकरीची संधी दिली. एका शेतकरी कुटूंबातील विद्यार्थ्यांच्या या यशोगाथे मागे  संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजने इंडस्ट्री इन्स्टिट्युट  इंटरॅक्शन  विभागाद्वारे जपानी भाषा प्रशिक्षण हे महत्वाचे कारण आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी दिली.



  कोल्हे म्हणाले, संजीवनी शैक्षणिक  समूहाने दुरदृष्टी ठेवून जपानी भाषा व संस्कृतीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले. या उपक्रमामुळे आतापर्यंत १५८ हून अधिक विद्यार्थ्यांना जपान मधील विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या  मिळाल्या आहेत. त्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध होत आहेत. शेतकरी, कष्टकरी व हातावर पोट असलेल्या ग्रामीण भागातील कुटुंबांतील विद्यार्थ्यांना जागतिक व्यासपीठावर काम करण्याची संधी मिळावी, असे स्वप्न संस्थेचे संस्थापक कै.शंकरराव कोल्हे यांनी पाहिले. हे स्वप्न आता प्रत्यक्षात येताना दिसते आहे. संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी प्रगत देशांमध्ये उद्योग व सेवाक्षेत्रात योगदान द्यावे हा संस्थेचे अध्यक्ष नितिन कोल्हे यांचा दृष्टीकोन आहे. त्या दिशेने संस्थेची वाटचाल सुरू आहे.
 संजीवनीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी प्रसाद परजने व त्याच्या आई वडिलांचे अभिनंदन केले   संस्थेच्या वतीने प्रसाद आणि  वडील बबन परजणे तसेच आई वैशाली  परजणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी इंजिनिअरींग कॉलेजचे डायरेक्टर डॉ. एम.व्ही. नागरहल्ली, विभाग प्रमुख डॉ. माधुरी जावळे, इंडस्ट्री इन्स्टिट्युट  इंटरॅक्शन  विभागाचे डीन प्रा. अतुल मोकळ उपस्थित होते.

      संजीवनी इंजिनिअरींग महाविद्यालयाच्या इंडस्ट्री इन्स्टिट्युट  इंटरॅक्शन विभागाच्या माध्यमातून  ए-टू-जे हिरामेकी इंडिया या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कंपनीच्या ‘फास्ट ऑफर इंटरनॅशनल’ उपक्रमांतर्गत प्रसाद परजणेला जपानमध्ये वार्षिक ३२ लाख रूपयांचे पॅकेज देऊन नोकरीची संधी देण्यात आली. एका शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश संपादन केले. त्यातून संजीवनी शैक्षणीक संकुलाची गुणवत्ता व दूरदृष्टी पून्हा अधोरेखित झाली
.- अमित कोल्हे (कार्यकारी विश्वस्त, संजीवनी शैक्षणीक संकुल, कोपरगाव)

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!