banner ads

बहादराबाद येथे बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा

kopargaonsamachar
0

 

बहादराबाद येथे बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा


कोपरगाव समाचार :--जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहादराबाद येथे विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला.शाळेचे मुख्याध्यापक संतोष पारासुर , उपशिक्षिका श्रीमती सुनीता गुंजाळ यांनी अतिशय नियोजनबद्ध बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते. सदर मेळाव्यास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण पाचोरे ,सरपंच सौ आश्विनी विक्रम पाचोरे ,मा.सरपंच विक्रम पाचोरे,बाळासाहेब पाचोरे,यांच्या उपस्थितीत बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला.




मेळाव्याचे उद्घाटन बहादराबाद गावच्या प्रथम नागरिक सरपंच तथा भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ आश्विनी पाचोरे यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी बाल आनंद मेळाव्यात सहभाग घेऊन नफा तोटा,व्यापार, खरेदी विक्री या सर्व व्यवहारांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.विद्यार्थ्यांनी पाणीपुरी,ओली भेळ,पोहे, मॅट रांगोळी,भाजीपाला,स्टेशनरी, आप्पे,मिठाई,फळे असे स्टॉल मांडण्यात आले होते.पालकांनी व ग्रामस्थांनी मनसोक्त खरेदी करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला.पालकांनी व ग्रामस्थांनी दिलेल्या उस्फुर्त सहभागाबद्दल मुख्याध्यापक श्री.पारासुर यांनी आभार मानले.


यावेळी दीपक आरोटे,रावसाहेब पाचोरे, बाळासाहेब पाचोरे, सरवार अशोक, दीपक पाचोरे, प्रवीण पाचोरे,संपत पाचोरे, संभाजी पाचोरे, साहेबराव पाचोरे, वाल्मीक पाचोरे, संपत माळी,वैष्णवी पाचोरे, सुनिता पाचोरे, निर्मला पाचोरे, सुलोचना पाचोरे, संगीता पाचोरे, हिराबाई दरेकर, मोनिका पाचोरे यांसह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!