कोल्हे कारखाना कार्यस्थळावर भगवानबाबांची पुण्यतिथी साजरी
कोपरगांव समाचार:- येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सालाबादप्रमाणे याही वर्षी भगवानबाबांची ६१ वी पुण्यतिथी साजरी करण्यांत आली.
प्रारंभी कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांनी भगवानबाबांच्या स्मृतीस अभिवादन केले. बीड जिल्हयातील सावरगांव घाट येथील आबाजी तुबाजी सानप हे महाराष्ट्र संत परंपरेत भगवानबाबा या नावाने परिचित होते. उसतोडणी कामगार त्यांना आपले आराध्यदैवत मानतात. अडाणी असलेल्या उसतोडणी कामगारांना समाजव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणुन त्यांना शिक्षणाचे महत्व पटवुन दिले. त्यांच्यातील अंधश्रध्दा चालीरिती दुर करण्यांसाठी भगवानबाबांनी विशेष पुढाकार घेतला.
याप्रसंगी संचालक ज्ञानेश्वर परजणे, बापुसाहेब बारहाते, सतिष आव्हाड, कार्यकारी संचालक सुहास यादव, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, मुख्य शेतकी अधिकारी एन. डी. चौधरी, उपशेतकी अधिकारी सी एन वल्टे, खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, उसतोडणी कामगार, मुकादम, वाहतुकदार आदि मोठया संख्येने उपस्थित होते.




