banner ads

सायकल यात्रेतून आरोग्य व पर्यावरणाचा संदेश

kopargaonsamachar
0

 

सायकल यात्रेतून आरोग्य व पर्यावरणाचा संदेश 

आत्मा मालिक ध्यानपीठ येथे स्वागत
कोपरगाव समाचार :---जयभवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्था, पिंपळगाव जलाल यांच्या वतीने तुळजापूर–अक्कलकोट सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 



या सायकल यात्रेच्या प्रवासादरम्यान यात्रेकरूंनी नुकतीच आत्मा मालिक ध्यानपीठ, कोकमठाण येथे सदिच्छा भेट दिली. या वेळी ध्यानपीठाच्या वतीने संत व विश्वस्त तसेच संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी सायकल यात्रेतील सहभागी सदस्यांचे स्वागत केले. याप्रसंगी संत व विश्वस्तांनी स्वतः सायकल रायडींगमध्ये सहभागी होत समाजाला आरोग्य व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी बोलताना नंदकुमार सूर्यवंशी म्हणाले की, “आजचा युवक सोशल मीडिया व मोबाईलमध्ये अधिक अडकत चालला असून त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रत्येकाने सायकलिंग व इतर व्यायाम प्रकारांचा अवलंब करून निरोगी जीवनशैली स्वीकारली पाहिजे.” त्यांनी आपल्या बालपणीच्या सायकल चालवण्याच्या आठवणींना उजाळा देत जयभवानी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांचे विशेष कौतुक केले.

जयभवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून दररोज २० किमी सायकल प्रवास, बालविवाह प्रतिबंध, पर्यावरण जागरूकता तसेच ‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’ हे उपक्रम सातत्याने राबवत आहे. या कार्यक्रमास आत्मा मालिक ट्रस्टचे संत विश्वानंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे,विश्वस्त प्रदीपकुमार भंडारी, जयभवानी संस्थेचे अध्यक्ष विजय भोरकडे, न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हाड, डॉ. पूजा आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!