सुवर्णपदक विजेत्या शौर्या गिरमे चा येसगाव ग्रामपंचायतकडून सत्कार
कोपरगाव समाचार:-- काठमांडू (नेपाळ ) येथे आयोजित भारत -- नेपाळ -- भूतान दरम्यान झालेल्या अंतरराष्ट्रीय ३ अ साईड हॉलीबॉल स्पर्धेसाठी येसगावची सुकन्या शौर्या रणजित गिरमे हिने भारतीय संघाची कर्णधार म्हणून धडाकेबाज कामगिरी करत भारतासाठी सुवर्णपदक पटकावल्या बद्दल येसगाव ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतने तिचा सत्कार केला.
यावेळी येसगाव ग्रामपंचायतचे सरपंच पुंडलिक गांगुर्डे, उपसरपंच संदीप गायकवाड ,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी सोसायटीचे चेअरमन तथा ग्रामपंचायतचे सदस्य सचिन कोल्हे ,ग्रामपंचायत अधिकारी सिद्धार्थ काळे यांनी ग्रामस्थांच्या वतीने तिचा यथोचित सत्कार करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या . शौर्या गिरमे हिने देशासाठी खेळताना केलेली कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठीनिश्चितच प्रेरणादायी असुन येसगावचीच नव्हेतर अहिल्यानगर जिल्ह्याची मान उंचावणारी असल्याचे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी सोसायटीचे चेअरमन सचिन कोल्हे यांनी म्हटले आहे.




