अवैध धंदे आमदार काळे यांच्या कार्यकाळात वाढले यावर शिक्कामोर्तब - वैभव आढाव
उलटा चोर कोतवाल को दाटे म्हणीचा कोपरगावमध्ये प्रत्यय
कोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरे
आमदार काळे हे प्रशासनावर वचक मिळवण्यात सपशेल अपयशी ठरले असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.कोपरगाव शहरात दिवसेंदिवस अवैध धंदे वाढल्याचे नागरिक बोलतात. अनेक अवैध धंद्यांत आ काळे यांचे निकटवर्तीय आढळून येत आहेत.चक्री बिंगोसह गोळीबार, नुकतेच उघडकीस आलेली सोने चोरी यात कुणाचे निकटवर्तीय आहे हे उघड झाले आहे असा घणाघात भाजपा शहराध्यक्ष वैभव आढाव यांनी केला आहे.
कोपरगाव मतदारसंघात मागील काही दिवसांपासून खुलेआम जुगार, मटका अड्डे, अवैध दारु विक्री, तंबाखू - गुटखा विक्री, ऑनलाईन बेटिंग, वाळूचोरी आदी अवैध धंदे बिनदिक्कत सुरु आहेत. यामुळे तरुण वाईट मार्गाला लागत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तरीही पोलीस प्रशासनाचे सदर गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असुन कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही असा आशय घेत आमदार काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेले निवेदन म्हणजे स्वतःच्या नाकर्तेपणावर काळे यांनी शिक्कामोर्तब केला आहे का अशीच चर्चा शहरात आहे.
या अवैध धंद्यांची जाग काळे यांना आत्ताच कशी आली ? शहरात मारामाऱ्या करून दहशत करणारा पी ए कुणाचा आहे ? रेशन घोटाळ्यात कुणाच्या पदाधिकाऱ्यावर आरोप झाले आहे ? अनेक जुगार सेंटर कुणाच्या कार्यकर्त्याचे आहे हे माहिती घेतल्यास नक्की उलटा चोर कोतवाल को दाटे अशी स्थिती झाली असल्याचे दिसून येते.
निवडणूक काळात असे पत्र उपमुख्यमंत्र्यांना देऊन कदाचित या व्यावसायिक लोकांवर दबाव टाकून आपले इप्सित ध्येय पूर्ण करणे हेतू आहे का ? राजकीय फायदा या व्यवसायातील लोक व काही स्वकीय करून देत नसतील किंवा राजकीय मदत होत नसेल त्यामुळे कदाचित आमदार काळे यांना सोयीची जाग आली आहे का ? असा सवाल निर्माण होतो आहे.यापूर्वी अनेकदा नागरिकांनी आवाज उठवले त्यावेळी का काळे असे उपंख्यमंत्र्यांना भेटले नाही, नेमके आत्ताच अशी जाग का आली असेल यामागे काही वेगळा उद्देश तर नाही ना असा संशय आढाव यांनी व्यक्त केला आहे.




