हमीभाव केंद्रावरच मका देण्यासाठी शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
कोपरगाव व राहाता तालुका मका हमीभाव खरेदीसाठी नोंदणी सुरू
कोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरे
मक्याचे बाजारात दर मोठ्या प्रमाणात कोसळल्याने हमीभाव केंद्रवार मका देऊन शेतकऱ्यांना जास्तीचा २४०० रूपये प्रति क्विंटल एवढा दर मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रावर नोंदणी करून आपली आर्थिक हानी टाळावी असे अवहान कोपरगाव तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी केले. ते बहादराबाद विविध कार्यकारी सोसायटीच्या मका हमीभाव केंद्राच्या नोंदणी कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
मका पिकाचे यंदा देशातच नाहीतर आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात मोठ्या प्रमाणात मकाचे बाजारभाव घसरले आहे. शासनाच्या हमीभाव खरेदीने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रावर नोंदणी करण्याचे अवहानही सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम हे होते.
हमीभाव नोंदणीसाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, बँक पासबुक व पीक पाहणी असलेला सातबारा उतारा लागणार आहे. नोंदणी केल्यानंतर पुढील पंधरा दिवसा पर्यंत प्रत्यक्ष खरेदी सुरू होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
नोंदणी कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब रहाणे, नानासाहेब गव्हाणे, कैलास रहाणे, बाळासाहेब गोर्डे, अशोकराव नवले, बंडोपंत थोरात, रावसाहेब थोरात, यशवंत गव्हाणे, लक्ष्मण दादा थोरात, माणिक दिघे, ज्ञानेश्वर गव्हाणे, सिताराम कांडेकर, वसंत थोरात, दत्तू थोरात, बाबासाहेब नेहे, सुनिल थोरात, मिनाकाका जोंधळे, जालिंदर कांडेकर, प्रकाश कालेवार, आर.सी. गव्हाणे, बाबासाहेब गव्हाणे, किसनराव पाडेकर,प्रभाकर रहाणे,नंदुआण्णा औताडे,गौरव औताडे,कोंडाजी रहाणे, मोहन पाचोरे, राजेंज्र पाचोरे, मंडळ कृषी अधिकारी अपूर्वा वामन, तालुका उपकृषी अधिकारी सुनिल घारकर, निवृत्ती पाचोरे, रविंद्र कुरकुटे, साहेबराव पाचोरे, गिताराम पाचोरे, आप्पासाहेब पाचोरे, मयुर पाचोरे आदींसह सोसायटीचे चेअरमन नवनाथ पाचोरे यांच्याह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुखलाल गांगवे यांनी केले तर प्रास्ताविक विक्रम पाचोरे यांनी केले. आभार सोसायटीचे सचिव सुनिल पाडेकर यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सोसायटीचे संचालक बाळासाहेब पाचोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
महाराष्ट्र राज्य स्टेट को- ऑपरेडिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड व जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या द्वारे संचलित कोपरगाव व राहाता तालुका मका हमीभाव केंद्र बहादराबाद विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे.




