banner ads

कोयटे- पिता पुत्रांनी जनतेची जाहीर माफी मागावी

kopargaonsamachar
0

 कोयटे- पिता पुत्रांनी जनतेची जाहीर माफी मागावी 

कोपरगाव -समाचार
 दिवंगत शंकरराव कोल्हे साहेब व दिवंगत शंकरराव काळे साहेब या दोन्ही कर्तव्यनिष्ठ नेत्यांवर गुन्हे दाखल आहेत असे म्हणण्याचा अथवा आरोप करण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही, असे सांगत या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून संदीप कोयटे यांनी केलेल्या वक्तव्याची जाहीर माफी मागावी अशी मागणी संतोष गंगवाल यांनी केली. आपण जर पंचवीस वर्षे या राजकीय पटलावरून गायब झाले होतात आणि पुन्हा याच राजकीय पटलावर येऊन असे गंभीर आरोप करणं हे अतिशय चुकीचं आहे
यावेळी संदीप कोयटे यांना मौलिक सल्ला देताना संतोष गंगवाल म्हणाले की संदीप कोयटे यांनी कोपरगाव तालुक्याचा तसेच शहराचा एकदा अभ्यास करावा आणि मगच त्या ठिकाणी आपण वक्तव्य करावे. आपण किंवा आपले पिताश्री विविध गुन्ह्यांमध्ये बरबटलेले आहात स्व.शंकरराव कोल्हे साहेब व स्व.शंकरराव काळे साहेब या दोन्ही कर्तव्यनिष्ठ नेत्यांवर गुन्हे दाखल आहेत ते राजकीय आंदोलने आहेत.त्यामुळे तुमच्या वडिलांसारखे प्रकाराचे ते गुन्हे नसल्याने असे बेछूट बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही.आपल्या वक्तव्यामुळे स्वर्गीय कोल्हे साहेब–काळे साहेबांवर प्रेम असणाऱ्या कार्यकर्त्यांचे मन दुखावले आहे. या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल संदीप कोयटे यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे. हे दोन्ही दिग्गज व्यक्तिमत्व कोपरगाव तालुक्याचे प्रमुख दोन नेते होते, कधीकाळी आपले वडील काका कोयटे हे त्यांचे कार्यकर्ते होते. आज दोघांपैकी एकाच्या अधिपत्याखालील निवडणूक लढवत आहात याचा विसर पडला असेल. काका कोयटे यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत संदीप कोयटे यांच्यावर देखील कॅनरा बँकेमध्ये 141 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची नोटीस आहे. याबद्दल सीबीआयने देखील गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे अगदीच आपण स्वच्छ आहोत असा बनाव करून खोटे बोलू नका असे संतोष गंगवाल यांनी कोयटे पिता-पुत्रावर निशाणा साधत वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.

यावेळी जितेंद्र रणशूर म्हणाले की, आपल्या नावात ‘समता’ असल्याचे सांगणाऱ्या काका कोयटे यांनी जर खरोखरच समतेचे विचार पाळले असते तर आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या वाचनालयाला ‘समता स्टडी सेंटर’ असे नाव देण्याऐवजी ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय’ असे नाव दिले असते. गेली चोवीस वर्षे काका कोयटे कोणत्याही सामाजिक न्यायाच्या लढ्यात दिसले नाहीत. मात्र निवडणुका आल्यानंतरच जनतेची दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांनी पुढे येतात, त्यामुळेत त्यांचे डॉ. आंबेडकरांवरील प्रेम हे फक्त दिखाव्यापुरते असून शहरातील आंबेडकरी जनता त्यांना चांगल्या प्रकारे ओळखून आहे. काका कोयटे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील प्रेमाचा फक्त दिखावा करतात. त्यांच्या नावात समता असली तरी वागण्यात विषमता दिसून येते, अशी टीका जितेंद्र रणशूर यांनी केली आहे.

जितेंद्र रणशूर म्हणाले,२५ वर्षांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीनंतरच काकासाहेब कोयटे यांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण झाली असून महापरिनिर्वाण दिन, जयंती किंवा धम्मचक्र परिवर्तन दिनाला ते कधीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ दिसले नाहीत, असा आरोप जितेंद्र रणशूर यांनी पत्रकार परिषदेत केला. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन विवेक कोल्हे यांनी पहिल्या कार्यकाळातच इतिहास घडवत दलित समाजातील रमेश घोडेराव यांना व्हाइस चेअरमन पदाचा सन्मान दिला. परंतु काका कोयटे चालवत असलेल्या समता पथसंस्थेत आजपर्यंत दलित समाजातील व्यक्तीला एकदाही व्हाइस चेअरमन पद मिळाले नाही.

विरोधी उमेदवार काका कोयटे व आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ निवडणूक आयोगाच्या विरोधात काळ्या फिती लावून आंदोलन करत निवडणूक कोल्हे गटामुळे पुढे ढकलली गेली असा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराष्ट्रातील इतर २४ नगरपालिका निवडणुका देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. २४ ते २७ नोव्हेंबर या तीन दिवसाच्या काळात प्रक्रिया पार पडणे आवश्यक होते ती न पडल्याने अनेक ठिकाणी हा पेच निर्माण झाला आहे.त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातील बारामतीची निवडणूकही आहे. मग फक्त कोपरगावातच भाजप व लोकसेवा आघाडीवर आरोप का? असा सवाल रणशूर यांनी उपस्थित केला. विरोधी उमेदवाराच्या अर्जात त्रुटी असूनही निर्णय अधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई केली नाही, त्यामुळे त्या उमेदवाराने संविधानाने दिलेल्या हक्कानुसार न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार निकाल झाले आणि राज्यभर अनेक ठिकाणी निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे, हे सत्य विरोधक जाणूनबुजून लपवत असल्याचेही त्यांनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या उमेदवारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ काळ्या फिती लावून न्यायालयाच्या आदेशाविरोधात आंदोलन केले आणि या कृतीतून त्यांनी न्यायालय व संविधानाचा अपमान केला आहे, असे रणशूर यांनी सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रातील २४ नगरपालिका आणि जिल्ह्यातील पाथर्डी, नेवासा, कोपरगाव आणि देवळाली प्रवरा या चार नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून 154 पेक्षा अधिक ठिकाणी सदस्य पदाची निवडणूक पुढे गेली आहे, तरीही काही अपूर्ण अभ्यासाने विरोधक नागरिकांमध्ये चुकीची माहिती पसरवत आहेत. भारतीय जनता पक्ष व लोकसेवा आघाडीच्या वतीने या दिशाभूल करणाऱ्या राजकारणाचा आम्ही निषेध करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!